सर्व जाती-धर्माच्या एकोपात अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत शिवछत्रपती यांची 392 जयंती बालाजी देडगाव येथे उत्साहात साजरी.
नेवासा तालुक्यातील देडगाव हे असणारे वैभव शाली गाव गावात विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली .अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले सर्व जाती धर्मांनी या शिवजयंती मध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला .
नेवासा तालुक्यातील आदर्श गाव एक आगळेवेगळे पुरोगामी विचाराचे व शिवरायांचा विचाराचा वारसा जपणार गाव शिवरायांच्या जयंतीनिमित्त उत्साहमय वातावरण निर्माण झालं .या जयंती मध्ये अनेक वक्त्यांनी आपलं शिव व्याख्यान सादर केले अनेक तरुणांनी शिवगर्जना देऊन मोठा आनंद घेतला.
गावात गावात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा दे डगाव .व ग्रामपंचायत देडगाव ,तसेच बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष च्या कार्यालय
वर ,व बालाजी कृषी केंद्र जवळ शिवनेरी ग्रुप च्या वतीने आणि देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या वतीने ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. तसेच अनेक याठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
या कार्यक्रमास माजी सभापती कारभारी चेडे , विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक बाजीराव पाटील मुंगसे,ज्येष्ठ पत्रकार बंशीभाऊ एडके,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाने ,शिवसेना तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे , उपसरपंच लक्ष्मण गोयाकर ,किशोर वांडेकर, व्यवसायिक संघटनेची किशोर मुंगसे ,मधुकर क्षीरसागर ,सचिन हिवाळे, आबा बनसोडे ,जिल्हा परिषद चे प्राचार्य भोसले सर व सर्व शिक्षक वृंद, प्रगत बागायतदार ,चंद्रभान कदम , माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे संभाजीराजे कजाळे, लक्ष्मण राव तांबे, अरुण बनसोडे, उध्दव मुंगसे, अशोक मुंगसे, साचिव रामा तांबे , पोपट मुंगसे,बळिराजा संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे ,वंचित बहुजन चे बलभीम सकट ,युवा नेते निलेश कोकरे ,एकनाथ फुलारी, रामनाथ कदम ,चांगदेव टकले ,सोपानराव तांबे ,आदिनाथ कदम, मयूर कदम ,नासिर पठाण, यश शिरसागर रामभाऊ चेडे, आदी गावातील मान्यवर शेकडो संख्येने उपस्थित होते.