जातीय सलोखा राखत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपतींची ३९२ वी जयंती खेडले परमानंद येथे उत्साहात साजरी.

जातीय सलोखा राखत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपतींची ३९२ वी जयंती खेडले परमानंद येथे उत्साहात साजरी.

जातीय सलोखा राखत खेडले परमानंद येथे सर्वसमावेशक शिवजयंती उत्सव साजरा.

         सालाबाद प्रमाणे यावर्षीही शिवजयंती उत्सव खेडले परमानंद याठिकाणी साजरा करण्यात आला. खेडले परमानंद मध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात परंतु या सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला.

           या कार्यक्रमाला मृदा व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी धावती भेट दिली.त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य सुनील गडाख हे उपस्थित होते. यावेळी मोडकळीस आलेल्या भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे नारळ पंचायत समिती सदस्य सुनील भाऊ गडाख यांच्या हस्ते फोडण्यात आले.

       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद माजी माजी विद्यार्थी सुरेश चव्हाण यांच्याकडून मुलांना शालेय बॅग (११००० किमतीचे) व पाण्याची बाटली देऊन एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. पंचायत समिती सदस्य सुनील गडाख यांच्या हस्ते मुलांना या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

          सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी कार्यक्रमाला धावती भेट दिली. जिल्हा परिषद सदस्य सुनिल गडाख यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य वाटप, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे नारळ, ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार समारंभ, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण , रुचकर स्नेहभोजन भोजनाचा आस्वाद घेत, पंचरंगी कार्यक्रम शिवजयंती उत्सवानिमित्त खेडले परमानंद येथे संपन्न झाला. यावेळी प्राथमिक शिक्षक संतोष निमसे सर यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान सादर केले. यावेळी पत्रकार गणेश बेल्हेकर,पत्रकार संभाजी शिंदे. हेही उपस्थित होते.

        यावेळी कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते, सर्व ग्रामपंचायत सदस्य,विकास सेवा सोसायटीचे सर्व सदस्य,मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, सरपंच राजेंद्र राजळे, ग्रामसेवक भाऊसाहेब श्री डौले, सूर्यभान आघाव, भाऊसाहेब मोकाशी, तंटामुक्ती अध्यक्ष दगू बाबा हवालदार, कोंडीभाऊ तूवर, सुलेमान इनामदार, मोहम्मद इनामदार, चांगदेव गोसावी, सिताराम तुवर,राजाबापू शिंदे ,डॉ भैय्या इनामदार, डॉ गुरसाळ, आलू भाई इनामदार, नानाभाऊ केदारी, बाळासाहेब आंबीलवादे, जावेद इनामदार, नयुम इनामदार, पापा भाई इनामदार , रंजीत मोकाशी,राजेंद्र बर्डे, रोहिदास बर्डे, संदीप केदारी, किशोर केदारी, कृष्णा राऊत, राहुल भुजबळ, दत्तात्रय भुजबळ, बाळासाहेब गोसावी,सागर भुजबळ, विजय शिंदे, अशोक जाधव, रोहिदास बर्डे,ताहीर इनामदार, भाऊसाहेब राजळे,अजित इनामदार, दादा पाटील तुवर,अशोक ब्राह्मणे, बाबासाहेब रोठे, खंडू बनकर, बापू बनकर, रमेश बनकर, चंद्रकांत जाधव,अशोक शिंदे, पेत्रस वैरागर, प्रदीप तुवर 

त्याचप्रमाणे महिला प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत सदस्य नीतू मोकाशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली शिंदे, राधिका गुरसाळ, प्राथमिक शिक्षिका, सविता दरंदले , मुख्याध्यापक सविता आव्हाड, अलका भुजबळ तसेच अनेक महिला वर्ग

वाडी वस्तीपासून ते गल्ली गल्ली तील प्रत्येक ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते

.