चाइल्ड इंग्लिश करियर स्कूल व ज्युनियर कॉलेज सलबतपुर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम व ज्युनिअर कॉलेज मध्ये दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजज
यंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा .तुकाराम पिसे साहेब (माजी तालुका कृषी अधिकारी औ.बाद)हे होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे विश्वस्त अंबादास गोरे, पालक रवींद्र गोरे,अशोक मगर,सुनील नजन, आदिनाथ निकम, विठ्ठल कर्डक सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
इयत्ता अकरावीच्या विज्ञानशाखेच्या विदयार्थीनी कुमारी रुपाली चावरे आणि वर्षा शिंदे यांनी केले. अध्यक्षांची निवड स्वाती गायकवाड मॅडम यांनी केली.
तसेच अनुमोदन सौ. आरती जैन मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सय्यद शारुक यांनी केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखातील विद्यार्थी
मयंक निकम, चैतन्य कुऱ्हाडे, आदेश मते, तसेच अफजल खानाच्या वेशभूषेत प्रसाद गरगडे याने केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवणावर स्वरा नागोडे,आरव पेहेरे,सोहम मते, ऋतुराज गवळी,प्रतीक शिंदे,विराज मते, साई नागोडे, मंगेश मनाळ,सार्थक कडू, समृद्धी साळुंके,श्रेया गोरे,साई औताडे, पलक कुऱ्हाडे, श्रेया वाक्चवरे, जिवनावरती भाषण केले. सदर कार्यक्रमात सहभागी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांची विद्यार्थ्यांना
मोलाचे मार्गदर्शन केले.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात पोवाडा, लेझीम नृत्य सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे निमित्ताने शाळेचे संस्थापक श्री. सागर बनसोडे यांच्या मार्गद्शनाखाली भौमितिक आकृत्या रांगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री प्राचार्य. संदीप खाटीक, प्रा.अमोल इंगळे सर, सौ. छाया निकम मॅडम, तसेच सौ.जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.