बालाजी देडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने " जागरूक पालक सुदृढ बालक" या मोहिमेचा शुभारंभ. .
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे प्राथमिक आरोग्य उप केंद्र च्या वतीने "जागरूक पालक सुदृढ बालक " या अभियानांतर्गत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
हा कार्यक्रम जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रविण चराटे यांनी केले असून त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना "जागरुक पालक सुदृढ बालक "या मोहिमेबद्दल अनमोल मार्गदर्शक करत आमची सर्व टीम या मोहिमेस सर्वा पर्यंत पोहोच करुन या परिसराचा आरोग्याचा विकास साधण्याचा प्रयत्न करू , आंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेत जाऊन सर्व विद्यार्थ्यांची तपासणी, व्यंग, डोळ्यातील तिरळेपणा, असे काही गंभीर आजार यावर तपासणी करून त्यांना पुढील रुग्णालयात संदर्भित करणार असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. असे प्रतिपादन केले. तर यावेळी प्रमूख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला असुन शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अजित गवळी,ज्येष्ट पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, पत्रकार विष्णू मुंगसे, जिल्हा परिषद शाळेचे बथूवेल डी. हिवाळे ,धामणे सर ,
कदम मॅडम ,कारंडे मॅडम, निमसे मॅडम तर आरोग्य सेविका श्रीमती अनिता सूर्यवंशी, आशा सेविका श्रीमती कोल्हे, श्रीमती गोफने, श्रीमती कदम, श्रीमती मुंगसे, श्रीमती लिला शिंदे व आदी पालक, शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार डॉ.प्रविण चरहाटे यांनी मानले.