नेवासा तालुक्यातील आदर्श चाइल्ड इंग्लिश करियर स्कूल चे तारे चमकले.

नेवासा तालुक्यातील आदर्श चाइल्ड इंग्लिश करियर स्कूल चे तारे चमकले.

           

नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत नावलौकिक मिळविलेल्या चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या 16 विद्यार्थ्यांनी " कांगारू"च्या ऑल इंडिया आर्ट,हस्ताक्षर या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.सदर स्पर्धेत शाळेच्या १६ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले असल्याची माहिती प्राचार्य संदीप खाटीक यांनी दिली.

               सदर स्पर्धेत कु.श्रद्धा कडूबाल साळुंके, कू. इशिता सचिन लंघे, मयंक संतोष निकम, कू.श्रावणी बाबासाहेब कर्डिले ,श्रेयस विशाल जैन, रूद्र संतोष शेळके , कू. सारिका दत्तात्रय कोहक, श्रेयस बाळासाहेब गव्हाणे , अथर्वा कैलास घुले, पृथ्वीराज रविकांत शेळके, कू. नेत्रा ज्ञानेश्वर पाठक ,आयात शाहरुख सय्यद, आराध्या सुरेश कर्डक ,शाहू अमोल मते ,सार्थक शिवनाथ चावरे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

            सदर स्पर्धेतील यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे, विश्वस्त अंबादास गोरे , डॉ.रवींद्र गोरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी अभिनंदन केले.