अहमदनगर रेल्वे पोलिस फोर्सच्या अधिकाऱ्यांनी पिंप्री अवघड ग्रामपंचायला दिली भेट, रेल्वे पटरीजवळ न जाण्याचे ग्रामस्थांना केले आवाहन .

अहमदनगर रेल्वे पोलिस फोर्सच्या अधिकाऱ्यांनी पिंप्री अवघड ग्रामपंचायला दिली भेट, रेल्वे पटरीजवळ न जाण्याचे ग्रामस्थांना केले आवाहन .

राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड या गावातील ग्रामपंचायतीला अहमदनगर रेल्वे विभागाच्या रेल्वे पोलिस फोर्सचे उपनिरिक्षक श्री . संतोष अहिरवार व सहा. उप निरिक्षक श्री .महेश साठे यांनी भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आहे .

 

 

        पिंप्री अवघड गावापासून काही अंतरावरून रेल्वे विभागाची वाहतुकीसाठी असणारी रेल्वे लाईन गेलेली आहे .याच गावातून शनिशिंगणापूर येथे जाण्यासाठी राहुरी ते शनिशिंगणापूर वाहतूक मार्ग याच रेल्वे मार्गावरून जातो .या रेल्वे मार्गावर ओव्हर ब्रिज बांधण्यात आलेले आहे .या ओव्हर ब्रिज खालून रेल्वे लाईन असल्याने अनेक रोड रोमिओ या निर्जन स्थळावर येऊन रेल्वे रुळावर उभे राहून फोटो शेशन करत असतात .काही दुचाकी प्रवासी या ठिकाणाहून रेल्वे मार्ग ओलांडताना रेल्वेच्या रुळाच्या दोन्ही बाजूला दगडांचा सहारा घेऊन रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात .त्यामुळे या ठिकाणी बरेच छोटे मोठे अपघात झालेले आहेत .तसेच अनेक व्यक्तींनी या ठिकाणी येऊन रेल्वे खाली आत्महत्याही केलेल्या आहेत .त्यामुळे पिंप्री अवघड येथील ओव्हर ब्रिज हे ठिकाण हॉटस्पॉट केंद्र बनलेले आहे .

 

        काही दिवसापूर्वी एका सायकल स्वाराने रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला असता अचानक आलेल्या रेल्वेने त्याची पळता भुई थोडी झाली .समोरून आलेल्या गोवा एक्स्प्रेसने सायकलचा धडक बसल्यावर चेहरामोहरा बदलून टाकला परंतु सायकलस्वार व्यक्तीला सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही . कारवाईच्या भितीने तो सायकलस्वार घटनेनंतर फरार झाला आहे अशी माहिती उपनिरिक्षक श्री .संतोष अहिरवार व सहाय्यक उपनिरीक्षक श्री . महेश साठे यांनी यावेळी दिली आहे .

 

        रेल्वे रुळ ओलांडण्याच्या तसेच रेल्वे रुळास नुकसान करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये .मनुष्याचा जीव अनमोल आहे ,यासाठी कोणीही रेल्वे रुळाच्या जवळ जाऊ नये असे आवाहन रेल्वे पोलीस फोर्स विभागाचे उपनिरीक्षक श्री . संतोष अहिरवार यांनी केले आहे .यावेळी पिंप्री अवघड ग्रामपंचायत मध्ये सरपंच परविनबानो शेख, उपसरपंच लहानू तमनर, ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड, सुरेश (गोपी ) लांबे, माधव लांबे, सुभाष राऊत, दिलीप गायकवाड, जेम्स गायकवाड, अकबर शेख, ग्रामसेविका सौ . शुभांगी चोखर, लिपिक कृष्णा कांबळे, संजय वाघमारे सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .