संत व्हिन्सेंट डि.पॉल चर्च आगाशेनगर येथे संत व्हिन्सेंट या संताचा सण भक्तीमय वातावरणात साजरा....

संत व्हिन्सेंट डि.पॉल चर्च आगाशेनगर येथे संत व्हिन्सेंट या संताचा सण भक्तीमय वातावरणात साजरा....

श्रीरामपूर :-दि.२९ /०९/२०२४ रोजी आगाशेनगर या ठिकाणी रविवारी सकाळी ठिक १०:०० वाजता संत व्हिन्सेंट डि पाॅल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर प्रतिमेचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी  वातावरण पवित्र मिस्साची भक्ती व आराधना करण्यासाठी कल्याण आश्रम ताबोर येथील मुख्य याचक रे.फा. डिर्बीन यांनी मिस्सा अर्पण केली.त्यांनी आपल्या प्रवचनात विल्सन या संतांचे कार्याविषयी माहिती दिली व भाविकांना संताचे अनुकरण करण्याचा संदेश दिला.या भक्तीमय व संगीतमय वातावरणात पवित्र भक्ती पार पडली.त्यानंतर व्हिन्सेंट डि पाॅल या संताची भव्यदिव्य स्वरुपात मिरवणूक काढण्यात आली.व नंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

          या कार्यक्रमाप्रसंगी मिशन सुपिरियर रे.फा . जिमिन्न, रे.फा. थॉमस, मॅनेजर रे फा.सिजो, व्यवस्थापक रे.फा. फ्रॉन्को, सल्लागार रे.फा. सॉन्टो, रे.फा‌.ए.बी., रे.फा. जोमी, रे.फा. सॅबॅस्टिमन, रे.फा. बॅन्साल,रे. फा. टिंनसन,रे.फा.मुक्ती, रे.फा. सजीन,रे‌.फा.जोसेफ,रे.फा.विलास सोनवणे, श्रीरामपूर धर्मग्रामाचे प्रमूख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव,आशादिप इंग्लिश मेडीयचे प्राचार्य रे.फा.राजू लोंढे, झेवियर इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य विक्रम शिणगारे,फा.जेकब गायकवाड,फा.मायकल वाघमारे,फा.पिटर डिसोजा, फा.संजय पठारे,रे.फा.सिस्टर सेलीन,सिस्टर दिप्ती यांच्यासह श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे, रविंद्र लोंढे सर, जाॅन सर,शहाजी सोनी, जोसेफ सुनिल बोरगे, सुभाष बोधक, दिपक कदम, नितीन जाधव, अतिश साळवे, सुंदर संसारे,अशोक तूपे, अल्ताफ शेख, राजू आवारे,विजय खरे, संजय अहिरे, पांडुरंग गागुर्डे, विशाल तेलोरे, नविन क्षीरसागर, संतोष दिवे तसेच संत लुक हाॅस्पिटल श्रीरामपूर व कनोसा होस्टेल शिरसगाव येथील सर्व सिस्टर्स, राहुरी,नगर,वावरथ, येवला, कोपरगाव, वांबोरी येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शेवटी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.