आबासाहेब काकडे विद्यालयामध्ये प्रा . सखाराम घावटे व श्री .बाळासाहेब जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न .
*आबासाहेब काकडे विद्यालयामध्ये प्रा. सखाराम घावटे व श्री. बाळासाहेब जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न*
आव्हणे बु :- आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सखाराम घावटे तसेच माध्यमिक विद्यालयातील शिक्षक श्री. बाळासाहेब जाधव हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्यामुळे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह व आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव यांच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह. भ. प. श्री.गणेश महाराज डोंगरे (जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ अहमदनगर ), मा.अँड.डॉ. विद्याधरजी उर्फ शिवाजीराव काकडे साहेब (अध्यक्ष कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगाव)सौ. हर्षदाताई काकडे (मा. सभापती महिला व बालकल्याण समिती अहमदनगर), संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे,आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्री. लक्ष्मणराव बिटाळ, श्रीम.वंदना पुजारी, विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय चेमटे, उपप्राचार्या श्रीम. रूपा खेडकर, उपमुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी भालसिंग, पर्यवेक्षिका श्रीम. पुष्पलता गरुड,पर्यवेक्षक श्री. लक्ष्मण गाडे, श्री.शिवाजी पोटभरे ,अँड.श्री.अविनाश मगरे, श्री. गहिनीनाथ कातकडे, संस्थेच्या विविध विद्यालयाचे आजी-माजी प्राचार्य आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या व शाळेच्या वतीने प्रा.सखाराम घावटे व श्री.बाळासाहेब जाधव यांचा कुटुंबियासमवेत संपूर्ण पोशाख, शाल ,बुके देऊन सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना दोन्ही सत्कारमूर्तींनी संस्था व विद्यालयाप्रती ऋण व्यक्त केले. यावेळी बोलताना सत्कारमूर्ती प्रा. सखाराम घावटे म्हणाले की अँड.डॉ. विद्याधर काकडे साहेब व सौ.हर्षदाताई काकडे यांच्यामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले.
आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अँड.डॉ. विद्याधरजी काकडे यांनी दोंन्ही सत्कारमूर्तींना भावी आनंदी व आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही त्यांनी शाळा, विद्यार्थी व समाज यांच्या प्रति बांधिलकी जपावी असे आवाहन केले.प्रा.सखाराम घावटे यांनी मराठी विषय व श्री.बाळासाहेब जाधव यांनी गणित विषय अत्यंत आवडीने, सोप्या पद्धतीने शिकवला असे ते म्हणाले.
जि. प. सदस्या सौ. हर्षदाताई काकडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,प्रा. सखाराम घावटे व श्री. बाळासाहेब जाधव यांनी शाळेला, आपल्या कामाला ,सर्वाधिक प्राधान्य दिले. भविष्यात दोघांनीही आपल्या कुटुंबाला व समाजाला वेळ द्यावा असे त्या म्हणाल्या व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मणराव बिटाळ आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की श्री. बाळासाहेब जाधव यांचे शैक्षणिक कामकाज हे अत्यंत आखीव-रेखीव स्वरूपाचे होते; तर प्रा. सखाराम घावटे हे सामाजिक पिंड असलेले व्यक्तिमत्व होते. मराठी विषयाचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून श्री.सखाराम घावटे यांनी नावलौकिक मिळवला. दोन्ही सत्कारमूर्तींनी शाळेने ,संस्थेने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. गणेश महाराज डोंगरे ,अँड.श्री.अविनाश मगरे,श्री. गहिनीनाथ कातकडे, माजी.प्राचार्य श्री.मच्छिंद्र पिसोटे,विद्यालयाचे शिक्षक श्री.श्रीकांत सोनवणे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. गायत्री ज्ञानदेव कुलट, श्रीम. वर्षा घावटे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा श्री. ईश्वर कातकडे साहेब यांनी देखील भ्रमणध्वनी वरून प्रा.श्री. सखाराम घावटे व श्री. बाळासाहेब जाधव यांना भावी जीवनासाठी शुभ संदेश दिला.
सदर कार्यक्रम प्रसंगी दोन्ही सत्कार मूर्तींचे कुटुंबीय, मित्र,नातेवाईक, ग्रामस्थ तसेच शेवगाव तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी उभयतांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय चेमटे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीम. जरीना शेख , श्री भाऊसाहेब गायकवाड यांनी केले.तर आभार उपप्राचार्या श्रीम.रूपा खेडकर यांनी मानले. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींच्या वतीने विद्यार्थी ,पालक व सर्व उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू- भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .