चाईल्ड करिअर इंग्लिश स्कूल सलबतपुर मध्ये हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचा प्रारंभ.
*चाईल्ड करिअर मध्ये हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचा प्रारंभ...*
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मेडीयम स्कूल & ज्युनियर कॉलेज मध्ये हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे आयोजन दिनांक - 24/7/2022 ते 21/08/2022 या कालावधीत करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेचे उदघाटन कार्यक्रम समारंभ आज पार पडला.
" सुंदर हस्ताक्षर हा खरा दागिना आहे " असा सुविचार शाळेत नेहमी शिकवला जातो मात्र या संगणकाच्या युगात हस्ताक्षर कलाच लोप पावते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून सुंदर अक्षर चळवळ राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यशाळा संयोजक सागर बनसोडे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री केदारेश्वर विद्यालय रानेगाव चे मुख्यध्यापक श्री.रविंद्र गावडे सर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त अंबादास गोरे, डॉ. रवी गोरे,श्रीमती शारदा गोरे आदी उपस्थित होते.
सदर कार्यशाळा 21 दिवसाची असून सदर कार्यशाळेत अहमदनगर येथील अक्षरतज्ञ मा. अशोक सप्तर्षी, कॅलिग्राफर हरेश्वर साळवे हे मार्गदर्शन करणार आहेत. सर्व विद्यार्थी व पालकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवावा असे अहवान करण्यात येत आहे. या कार्यक्रमास, संतोष काळे, रावसाहेब औताडे, नवनाथ मते, प्रमोद मते, राजू गोरे, राहुल पेहेरे, आकाश वाकचौरे भास्कर गोरे, प्रशांत मते, अमोल मोरे, शेळके सुभाष
हे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते तर कार्यशाळा यशस्वीतेसाठी संदीप खाटीक, शाहरुख सय्यद, विजय खाटीक, संजय गरुटे, अभिजित आरगडे, अमोल इंगळे, अशोक मगर
श्रीमती सोनाली लोखंडे, छाया निकम, उमा कुमावत, स्वाती गायकवाड, आरती जैन, सुप्रिया लिंबे आदी परिश्रम घेत आहेत.