ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे अनुभवी लिखाण भावी पिढीसाठी प्रेरणादायी - निर्माते दिग्दर्शक नागराज मंजुळे.

ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे अनुभवी लिखाण भावी पिढीसाठी प्रेरणादायी - निर्माते दिग्दर्शक नागराज मंजुळे.

प्रतिनिधी:- संभाजी शिंदे खेडले परमानंद

 

नागराज मंजुळे; मनातला पाऊस पुस्तकाचे प्रकाशन  सोहळ्याप्रसंगी बोलताना म्हणाले.

यशवंतराव गडाख हे व्यक्तिमत्व वट व्रृक्षासारख असुन साध्या गोष्टीतला आनंद त्यांनी पुस्तकातुन व्यक्त केला राजकारणी असुनही निसर्गाबद्दल आस्था,प्रेम बाळगुन त्यांनी जीवनातल्या उपकारक गोष्टी यापुस्तकातुन उलगडुन सांगितल्या .महाकाव्य ,कादंबरी सारख त्यांचे काम आहे असे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले.

        मुंबईतल्या नरिमन पाॅंईट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील हाॅलमध्ये आज सायंकाळी जेष्ठ नेते य़शवंतराव गडाख यांच्या मनातला पाऊस यापुस्तकाचे प्रकाशन दिग्दर्शक मंजुळे संपादक राजीव खांडेकर, कुलपती पी डी पाटील,पत्रकार अंबरीश मिश्र,मंत्री छगन 

भुजबळ,मंत्री शंकरराव गडाख व उल्हासदादा पवार यांचे हस्ते झाले. माजी खासदार यशवंतराव गडाख,खासदार विनायक राऊत, आेमराजे निंबाळकर, आमदार मंजुळा गावीत,आमदार दिपक केसरकर,आमदार प्रकाश आंबेटकर,आमदार महेंद्र थोरवे आमदार शेखर निकम,आमदार शहाजीबापु पाटील,आमदार किशोर नाॅर्वेकर,सेनेचे भाऊ कोेरेगावकर व उदयन गडाख आदी या कार्यक्रमास उपस्थित होेते.      

                  प्रारंभी या साहित्यिक अरुण शेवते यांनी या पुस्तकाची भूमिका स्पष्ट केली.यशवंतराव गडाखांशी मैत्री पुस्तकातुनच झाल्याचे त्यांनी सांगितले.या पुस्तकातुन यशवंतरावांचे आयुष्य व प्रवास तसेच त्रासातुनही कसा आनंद मिळवला हे सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या राजकारणांमध्ये मनातला पाऊस कठीण असुन यशवंतरावांनी सोनईच सोनं केल .राजकारणार असुनही सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी वावर ठेवत समाजमन जपल ते मधुर संबंधांमुळेच या पुस्तकातुन त्यांनी भावनांचे हिंदोळे लोकांसमोर माडले.चागल्या कामांमुळेच गडाख घट्ट पाय रोवुन असुन मंत्री शंकररावांना भविष्य उज्वल असल्याचेी सांगितले. तर पत्रकार अंबरीश मिश्र यांनी ग्रामविकासातले सत्य यापुस्तकात मांडण्यात आल्याने ते कसे मोलाचे आहे हे सांगितले. तर उल्हास पवार यांनी यशवंतरावांनी अंर्तमनातल दु ख ,कोलाहल व कल्लोळ पुस्तकातुन मांडला असुन राजकारणी बोलतात पण लिहीत नाहीत त्यात यशवंतराव कसे अपवाद आहेत हे सांगितले.

राजकारण्यांच्या मनातल्या आठवणी टिपण अवघड असत पण संपादन करुन ते अरुण शेवतेंनी शक्य केल्याचे सांगितले.कुलपती पाटील यांनी हा मनातला पाऊस नव्हे तर विचार असल्याचे सांगितले शुन्यातुन चढउतार व निसर्गसानिध्यात राहुन मिळवलेली नवी ऊर्जा प्रेरणादायक असल्याचे सांगितले संपादक खांडेकर यांनी यशवंतराव चव्हाणांची सुसंकृतपणाची विचारधारा मनापासुन पुढे नेणारे यशवंतराव गडाख हेच असुन आदर्श म्हणुन बघाव असे ते आहेत मनातला हा पाऊस प्रत्येकाच्या मनातला असुन सुसंकृतपणातुन जे जपल तेच त्यांनी पुस्तकातुन मांडल आहे डॉ सुभाष देवढे यांनी सुत्रसंचालन केले तर शर्वरी शेवते यांनी आभार मानले.

        नेवासा तालुक्याचा कायापालट करण्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मा .खा यशवंतराव गडाख यांचा मोलाचा वाट आहे.

      ----------------------------