डिग्रस शिवारातील चोरट्या वाळूला अहमदनगर जिल्हा गौन खनिजच्या पथकाचा झटका-तर बारागाव नांदूर वाळू तस्करीवर साहेब मेहरबान .

डिग्रस शिवारातील चोरट्या वाळूला अहमदनगर जिल्हा गौन खनिजच्या पथकाचा झटका-तर बारागाव नांदूर वाळू तस्करीवर साहेब मेहरबान .

अहमदनगर येथील जिल्हा गौन खनिज पथकाने आज डिग्रस येथील मुळा नदीमध्ये ट्रॅक्टर व यारीच्या सहाय्याने वाळू तस्करी दररोज रात्रभर जोमात चालु तर कोणतेही पथक येथे आल्यानंतर बारागाव नांदूर शिवारात दंडात्मक कार्यवाही करण्यास जात नाही फक्त डिग्रस येथील वाळूतस्करांवरच कार्यवाही होते त्यासमोर बारागाव नांदूर हद्दीमध्ये तर नर्सरीच्या पलीकडे सूरु असनाऱ्या वाळू तस्करांवर कार्यवाही न करताच पथक निघून जातात यामागे  वरदहस्त कोणाचा हे शोधणे गरजेचे आहे .

डिग्रस व बारागाव नांदूर हद्दीतून दररोज शेकडो ब्रास वाळू चोरून विकली जाते . येथील अधिकारी फक्त लोकांच्या समाधानासाठी एखादी गाडी पकडतात व दोन चार दिवस तहसिल कार्यालयाच्या व पोलिस स्टेशन च्या गेटच्या आत लावतात व त्याची सर्व गाडी पकडलेला पंचनामा वगैरे सर्व तयार करतात नंतर कुणाचा तरी फोन येतो लगेच गाडी दंडाची पावती न भरताच निघुन जाते . असे अनेक प्रकार झाले आहेत तसेच काही जणांच्या गाड्या ज्या आत लावल्या आहेत त्यांचं डायरेक खत होण्याकरीताच त्यांच्या टायरांची हावा सोडली जाते तर ठराविक गाड्या वरच कार्यवाही होते तरी ज्या चोरट्या वाळू तस्करी किंवा मुरूम तस्करीच्या गाड्या पकडल्या तर कलम 3 / 15 प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी आशी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

आजच्या कार्यवाहीस डिग्रस मुळानदीपात्रात १) श्री सानप २) गणेश म्हसे ३ ) फुलमाळी मंडळअधिकारी ४ ) श्री घुमरे ५ ) स्थानिक मं.अधिकारी श्री दत्ता गोसावी. डिग्रस गावचे सरपंच - उपसरपंच हे यावेळी उपस्थीत होते.

तरी बाकी पत्रकार बंधु व सरपंच - उपसरपंच यांनी देखील या अधिकाऱ्यांना बारागाव नांदूर हद्दीलगतच्या म्हणजे मुळा नदी च्या पलिकडेच दिसनाऱ्या वाळूच्या ढिगार्‍याचा व येथे समोर दिसणाऱ्या तस्करीची कार्यवाही न करताच आम्ही काय तुमच्या सर्वच तालुक्यातील वाळूची कार्यवाही करायला मोकळेच आहोत काय? असे हसत हसत उत्तर देऊन आता ५ वाजले सुट्टी झाली असे म्हणत येथे डिग्रस शिवारातील दोन ठिकाणे मिळून सुमारे ४५ ते ५० ब्रास वाळू साठा जप्त करून वांबोरी मं.अधिकारी श्री गोसावी यांचे ताब्यात दिला व समोर दिसणारे बा.नांदूर हद्दीतील

चोरट्या वाळूच्या ढिगार्‍यांचे पंचणामे करण्यास महिला मंडल अधिकार्‍यांस सांगून तेथून निघून गेले तर नागरिकांनी कोणत्या अधिकारी वर्गावर विश्वास ठेवायचा अशी चर्चा सध्या स्थानिकांमध्ये सुरु आहे.