घरगुती गॅस अवैधरित्या वाहनात भरणारा आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

घरगुती गॅस अवैधरित्या वाहनात भरणारा आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

घरगुती गॅस टाकीतील गॅस अवैधरित्या एलपीजी वाहनात भरणारा आरोपी 67,000/- रु. किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद .

 

               जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्हेगारांची धोबीपछाड चालू केली आहे .जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तातडीने तपास लावून गुन्हेगारांना जेलची हवा खाण्यास भाग पडले आहे .जिल्ह्यात ज्या ठिकाणीअवैध धंदे सुरू आहेत अशा सर्व ठिकाणची माहिती घेऊन त्या ठिकाणी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

 

                जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश यांनी दिनांक 06/10/23 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, पोलीस नाईक सचिन आडबल, संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ, रणजीत जाधव अशा पोलीस अंमलदाराचे पथक नेमुन अहमदनगर शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक मार्गदर्शन करुन तात्काळ रवाना केले. पथक अहमदनगर शहरात फिरुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना खबऱ्या माहिती मिळाली की मार्फत सचिन शिंदे, रा. वैदुवाडी, अहमदनगर हा धोकादायक पध्दतीने घरगुती गॅस टाक्या या एलपीजी वाहनामध्ये अनधिकृतपणे गॅस भरण्याचे उद्देशाने स्वत:चे कब्जात बाळगुन आहे. 

             अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, खात्री करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने पथकाने तात्काळ बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता एक इसम बसलेला व त्याचे बाजुस लाल रंगाच्या गॅस टाक्या दिसुन आल्या .पथकाची खात्री होताच 01.00 वा. च्या दरम्यान अचानक छापा टाकुन सदर इसमास ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन प्रकाश शिंदे वय 34, हल्ली रा. वैदुवाडी, सावेडी, अहमदनगर मुळ रा. श्रमिक नगर, पंचक जेल रोड, नाशिक रोड, जिल्हा नाशिक असे असल्याचे सांगितले. 

 

              सदर इसमाकडे घरगुती गॅस टाक्या वापरा बाबत व गॅस भरणे बाबत परवाना आहे का ? अशी विचारणा करता सदर इसमाने अधिकृत परवाना नसले बाबत माहिती दिल्याने आरोपीचे कब्जातुन 8 भारत गॅस कंपनीच्या टाक्या, गॅस रिफीलींग मशिन, व गॅस नोझल असा एकुण 67,000/- रु. किंचे मुद्देमाल ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 2023 भादविक 285, 286, 336 सह जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.

 

              सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ,अहमदनगर, प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.