शिर्डीत भाविकांची लूट: 200 रुपयांचा गजरा 2 हजाराला विकला, विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल*

शिर्डीत भाविकांची लूट: 200 रुपयांचा गजरा 2 हजाराला विकला, विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल*

*शिर्डीत भाविकांची लूट: 200 रुपयांचा गजरा 2 हजाराला विकला, विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल*

*शिर्डी, दि. 7*: साईबाबांच्या शिर्डीत दुकानदारांकडून भाविकांची आर्थिक लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 200 रुपयांचा मोगऱ्याचा गजरा 2 हजार रुपयांना विकल्याप्रकरणी एका विक्रेत्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली (ठाणे) येथील भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत आले होते. दर्शनासाठी फुले खरेदी करताना दुकानदाराने 200 रुपयांच्या गजऱ्यासाठी 2 हजार रुपये घेतले. भाविकाने याबाबत संस्थान प्रशासन व पोलिसांकडे तक्रार केली. चौकशीनंतर संबंधित विक्रेत्यावर फसवणूक व जादा दराने विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

साई संस्थान व पोलीस प्रशासनाने शिर्डीतील दुकानदारांना भाविकांची लूट न करण्याचे आदेश वारंवार दिले आहेत. तरीही अशा घटना घडत असल्याने भाविकांतून संताप व्यक्त होत आहे. दरपत्रक लावणे व पावती देणे बंधनकारक असतानाही नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप भाविक करत आहे