सोपान रावडे हे गांधी जयंतीच्या दिवसापासून करणार अन्न त्याग आंदोलन,जिल्ह्यातील सर्व माहिती अधिकार संघटना व पत्रकारांनी जातीने लक्ष घालण्याची केली मागणी .

सोपान रावडे हे गांधी जयंतीच्या दिवसापासून करणार अन्न त्याग आंदोलन,जिल्ह्यातील सर्व माहिती अधिकार संघटना व पत्रकारांनी जातीने लक्ष घालण्याची केली मागणी .

           

नेवासा तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्हा शासकीय विभाग हादरवून सोडणारे सोपान रावडे हे गांधी जयंतीच्या दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करणार आहे .सोपान रावडे यांनी माहिती अधिकारांतर्गत ग्रामीण स्तरावर काम करणारे सरकारी कर्मचारी यांनी ग्रामपंचायत मधून खोटा ठराव घेऊन शासनाची लूट केली आहे हे पुराव्यासहित सादर केले आहे .या शासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे त्यांची मागणी होती .यासाठी त्यांनी विविध आंदोलने केली आहे .शासन दखल घेईना म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांच्या वाहनांची हवा सोड आंदोलन सुरू केले .

 

              संपूर्ण जिल्ह्याला व प्रशासनाला जागं करण्याचं काम त्यांनी केलं आहे .यावर कारवाई न करता उलट रावडे यांना थांबवण्यासाठी त्यांच्या कुटुंबावर मारहाण करण्यात आली व त्यांच्यावरच ॲट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नगर जिल्ह्यातील सर्व माहिती अधिकार संघाटनांनी तसेच पत्रकारांनी या घटनेकडे जातिने लक्ष घालून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे .

 

           हवा सोडा आंदोलन दडपविण्यासाठी रावडे कुटुंबावर मारहाण करण्यात आली . खोट्या ॲट्रॉसिटी चा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला याविषयी सहा. पोलिस निरीक्षक , पो.स्टे.शिंगणापुर, ता.नेवासा जि. अहमदनगर,मा. गट विकास अधिकारी , पंचायत समिति, नेवासा, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी , शेवगाव ता. शेवगाव अ.नगर,तहसिलदार , तहसील कार्यालय, नेवासा,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर, यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे .तरी दोषी अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी पाठिशी घालून रावडे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेतली गेली नाही ,तसेच खोट्या आरोपाखाली दाखल केलेली ॲट्रॉसिटी गुन्ह्यात रावडे यांना अटक करण्यात आली आहे .न्याय मिळण्यासाठी महात्मा गांधी जयंती या २-१०-२०२२ दिवसापासून सोपान रावडे अन्न त्याग आंदोलन करणार असल्याचे समजले आहे .