जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे ७५ वा प्रसत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
बालाजी देडगाव :- ( प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गावठाण येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गावभर प्रभात फेरी काढत जय जवान जय किसान, भारत माता की जय, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अशा घोषणामध्ये गावभर आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.
प्रभात फेरीनंतर शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली तर विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या शुभहस्ते झेंडा फडकून ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत व ध्वजगीत घेण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सतीश भोसले सर यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले .तर काही मुलांनी आपले देशभक्तीवर गीते तर आपली मनोगते व्यक्त केली. ग्रामस्थांनी मुलांचे कौतुक व अभिनंदन केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त देडगाव मंडल अधिकारी सुनील खंडागळे रावसाहेब, बन्सी पाटील मुंगसे, माजी उपसभापती कारभारी चेडे, मा. चेअरमन कडूभाऊ तांबे, मा. चेअरमन बाबासाहेब मुंगसे, मेजर गीताराम मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, उपसरपंच महादेव पुंड, संभाजीराव काजळे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, गोरक्षनाथ नांगरे गुरुजी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाने ,राज पतसंस्थेचे चेअरमन संतोष टांगळ, पास्टर मनवेल हिवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आबासाहेब बनसोडे, सचिन हिवाळे,जिल्हा परिषद शिक्षक दत्तात्रय धामणे सर, अश्विनी कदम मॅडम, कविता करंडे मॅडम व सोनई येथील कृषी विद्यालयाचे कृषी दुत भरत मिसाळ, हर्षवर्धन निंबाळकर ,विनय नवथर ,ओंकार मरकड, राम थोरात, युवराज लांडगे, गौरव मस्के, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कृषी दुतानी शाळेमध्ये वृक्षारोपण करत शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बथूवेल डी. हिवाळे यांनी केले तर आभार भाऊसाहेब सावंत सर यांनी मानले.