तेलकुडगाव येथे भीमशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

*तेलकुडगाव येथे भीमशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी.*
नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे भीमशक्ती युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या वतीने 134 वी महामानव बोधिसत्व, विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भंतीजी गाजभिव व गावातील प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व मानवंदना देण्यात आली.
जयंती सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाला अध्यक्ष बाबुराव काळे पाटील लाभले .तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपट सरोदे यांनी केले. तर विद्यमान सरपंच सतीश काळे, माजी सरपंच काकासाहेब काळे, विद्यमान चेअरमन शिवाजीराव घोडेचोर, शिरसाठ, माझी चेअरमन काकासाहेब काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवराय व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले.
जयंती सोहळ्याचा अनावश्यक खर्च टाळता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भिमशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आली.
यावेळी उपसरपंच शरद काळे ,साईनाथ काळे ,माजी सरपंच बालकनाथ काळे, संजय घोडेचोर ,ग्रामसेवक काळे भाऊसाहेब ,तर सरपंच, उपसरपंच, सदस्य ,चेअरमन ,व्हाईस चेअरमन, संचालक, विविध संघटनेचे शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी भीमशक्ती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश तेलधुणे ,उपाध्यक्ष राजू साळवे, सचिव शरद मिसाळ ,सदस्य दीपक शिरसाठ,भाऊसाहेब साळवे, गहिनीनाथ तेलधुणे ,सागर सरोदे, विश्वास तेलधुणे ,संतोष तेलधुणे ,ज्ञानेश्वर तेलधुणे ,संतोष साळवे ,बाबासाहेब सरोदे, ॲड . किरण सरोदे, संतोष दिनकर साळवे ,बंडू साळवे ,प्रकाश सरोदे, कृष्णा सरोदे ,निलेश साळवे ,संजय साळवे ,अंबादास सरोदे, हरिभाऊ साळवे, भागचंद साळवे ,संजय साळवे आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
तर भीम जयंती निमित्त सायंकाळी फटाक्याच्या आतषबाजी मध्ये ढोल ताशाच्या वाद्याच्या मिरवणुकीमध्ये भव्य मिरवणूक पार पडली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार भीमशक्ती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश तेलधुणे यांनी मा
नले.