शेतकऱ्यांना पंधरा दिवसानंतर महावितरणाने दिलेल्या ट्रांन्सफार्मर तोही बंद अवस्थेत विद्युत महावितरणाने केली शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांची महावितरण विरोधात ट्रान्सफॉर्मर समोर बोंबाबोंब आंदोलन.

शेतकऱ्यांना पंधरा दिवसानंतर महावितरणाने दिलेल्या ट्रांन्सफार्मर तोही बंद अवस्थेत विद्युत महावितरणाने केली शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांची महावितरण विरोधात ट्रान्सफॉर्मर समोर बोंबाबोंब आंदोलन.

                                 

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील,येथील सांडवा फाटा. काळे वस्ती येथे मागील पंधरा दिवसांपूर्वी भर उन्हाळ्यात शेतीला वीजपुरवठा करणारा, ट्रांसफार्मर जळाला. त्यामुळे विजेच्या अभावी शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याने तसेच त्या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा साठा उपलब्ध नसल्याने शेतीचे तसेच मुक्या प्राण्याना पिण्याचे पाण्याची व्यवस्था नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. ट्रांसफार्मर जळाल्यानंतर जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच शेतकऱ्यांनी महावितरण अहमदनगर यांच्या ऑफिसला जवळपास ३ ते ४ वेळा तक्रार केली. महत्त्वाचे म्हणजे ट्रांसफार्मर खराब झालाय याची माहिती अनेक दिवस महावितरणाच्या कार्यालयास महावितरणच्या कर्याचाऱ्यानी मुख्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना कळवली नसल्याने शेतकऱ्यांच्या वतीने मागील ३ दिवसांपूर्वी महावितरणचे प्रमुख यांच्या कार्यालयावर जाऊन बसल्यानंतर त्यांनी तातडीने आपल्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी ट्रांसफार्मर देण्यासाठी कळवले आणि हा सदरचा ट्रांसफार्मर काल दि. २७ मे २०२३ रोजी सायंकाळी लावण्यात आला .परंतु हा ट्रांसफार्मर जोडल्यानंतर,तातडीने शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा होती.परंतु वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत,झालाच नाही.या बाबत उपस्थित शेतकऱ्यांनी महावितरण च्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता,त्यांनी सांगितले की सदरचा ट्रान्सफॉर्मर हा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नजरचुकीने नादुरुस्तच केलेला पाठवला गेला आहे. महावितरण चे प्रमुख कार्यकारी अभियंता लहामगे यांना कळवल्यानंतर ही जर अशा प्रकारे नादुरुस्त झालेले ट्रांसफार्मर लावले जात असतील तर निश्चितपणे ही चिंतेची बाब आहे.आणि त्यामुळे या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामधील असलेला भोंगळ कारभार यातून दिसत आहे. त्यामुळे आपल्या महावितरण विभागाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने, या घटनेच्या निषेधार्थ सर्व शेतकरी बांधवांना घेऊन ज्या ठिकाणी ना दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवला गेला, त्या ठिकाणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने विद्युत महावितरणाच्या अहमदनगर प्रशासना विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले यावेळी जनधन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत मतीन सय्यद, जयसिंग काळे, संतोष काळे, धनंजय काळे, रवींद्र काळे, अमोल काळे, महेश काळे, तनवीर शेख, रेवनात काळे, श्याम काळे, बाळू लबडे, शिवाजी काळे, देविदास काळे, संपत काळे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच त्या ठिकाणी असलेले वीज पोल व तारा या अतिशय कुचकट झाले असून हे तारा वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटल्याने या ठिकाणचा ट्रान्सफॉर्मर हा अनेक वेळा जळत आहे. तरी विद्युत महावितरणाने तेथील तारा बदलून ट्रांसफार्मर हा येत्या 24 तासांमध्ये दुसरा व्यवस्थित बसवला नाही तर याच शेतकऱ्यांना घेऊन महावितरणाच्या कार्यालयावरती तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे म्हणाले.....

.