केंद्रीय पत्रकार संघाच्या जिल्हाअध्यक्ष पदी मोहन गायकवाड यांची निवड ...

खेडले परमानंद(प्रतिनिधी):- नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांची केंद्रीय पत्रकार संघ (सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन) उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली देशाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले व केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कासालकर यांचे हस्ते निवडीचे पत्र मोहन गायकवाड यांना देण्यात आले.
शिर्डी येथील हॉटेल ९ कॉईन येथे केंद्रीय पत्रकार संघाचें संमेलन आयोजित करण्यात आले होते या वेळी राज्यभरासह, जिल्ह्यातील व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहन गायकवाड यांच्या निवडी बद्दल विविध दैनिकाचे संपादक व पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच पत्रकार बांधवानी यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी पत्रकारांच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर राहणारं तसेंच पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचे प्रतिपादन गायकवाड यांनी केले लवकरचं जिल्हा स्तरावरील पुढील कार्यकारणी जाहिर करणार असल्याचे या वेळी त्यानी सांगितले.