महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव खेडले परमानंद या ठिकाणी हिवाळी शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन .

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव खेडले परमानंद या ठिकाणी हिवाळी शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन .

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव खेडले परमानंद या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी हिवाळी शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन .यामध्ये कबड्डी खो-खो , भाला फेक थाळीफेक , गोळाफेक , धावण्याच्या स्पर्धा , उंच उडी , लांब उडी ,मल्लखांब , अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 

               दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली , आज अल्पसंख्यांक दिवस असल्याकारणाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन अल्पसंख्यांक दिवस साजरा करण्यात आला .स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये मुळा एज्युकेशनचे क्रीडा विभाग प्रमुख पाटील तूवर सर मुख्याध्यापक ढाले सर, क्रीडा शिक्षक गडाख सर .स्कूल कमिटी अध्यक्ष शिवाजी जाधव ,सामाजिक कार्यकर्ते दिगंबर जाधव,पत्रकार संभाजी शिंदे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कानडे सर यांनी केले.

      

           यावेळी मार्गदर्शन करताना पाटील तूवर सर म्हणाले की विद्यार्थ्यांमधून सर्व गुण संपन्न भावी नागरिक घडवण्यासाठी सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा . विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या मायाजाळातून बाहेर पडावे व मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून मानसिक व बौद्धिक विकास घडून येईल . आज समजात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मोबाईल मुळे संवाद कमी झालेला आहे व त्यामुळे विचाराची देवाण-घेवाण कमी प्रमाणात होते .ही दरी भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा . सांघिक खेळामधून विद्यार्थ्यांमध्ये मैत्री भावना वृद्धिंगत होते .वैयक्तिक खेळामध्ये आत्मबळ वाढते म्हणून शालेय जीवनात क्रीडा स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन प्रत्येक खेळामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा . खेळामध्ये होणारी हार जीत ही विद्यार्थ्यांना मान अपमान पचवण्याची सहनशीलता देते असे मौलिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.

       

            त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संभाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला दोन पिढ्यांना घडवणाऱ्या क्रीडा शिक्षक डि बी गडाख सर यांचे आभार मानले ,शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये 1997 - 98 साली एमसीसी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गडाख सर यांनी घडवल व दिशा दिली .आज ही गोष्ट मोठ्या अभिमान सांगाविशी वाटते की क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये यशस्वी होताना दिसून येत आहेत .मुख्याध्यापक व विद्यालयातील शिक्षक नेहमी पालकांच्या संपर्कात असतात .ही गोष्ट विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे असे प्रतिपादन शिंदे यांनी केले .