सोनई ग्रामीण रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या वाड्यावर आरोग्य सेवेचे वाजले तीन तेरा आशा सेविकेचे नेमके काम काय
सोनई ग्रामीण रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या वाड्यावर आरोग्य सेवेचे वाजले तीन तेरा आशा सेविकेचे नेमके काम काय
गणेशवाडी (वार्ताहर) -- नेवासा तालुक्यातील सोनईतील ग्रामीण रुग्णालयातआरोग्य सेवेचे तिन तेरा वाजले आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. डेंग्यू, मलेरिया सारख्या आदी आजाराने डोके वर काढलेले दिसत आहे. मात्र त्याचे आरोग्य विभागाला कुठल्याही प्रकारे सोयरसुतक नाही. सोनई ग्रामीण रुग्णालय सध्या असुन अडचण नसून खोळंबा बनले आहे . या ग्रामीण रुग्णालया अंतर्गत ३८ आशा सेविका आहेत. परंतु त्यांचे काम कसे चालते कधी चालते याची कुठल्याही गावकऱ्यांना कल्पना सुध्दा नाही. पावसाळ्यात डबके साचलेले असतात. त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांची घरो घरी जाऊन जन जागृती होणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना कुठे आढळत नाही. सोनई ग्रामीण रुग्णालयात गेले तरी त्या ठिकाणी वेळेवर डाॅक्टर उपलब्ध नसतात. शासनाने ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी शासनाने योग्य मानधनावर या आशा सेविका कार्यान्वित केल्या . परंतु त्यांचा त्यांना विसर पडला की काय अस वाटायला लागले आहे. शासनाने विविध आजारावर मोफत औषधही या आशा मार्फत जनतेला मिळाले पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधे देखील उपलब्ध करून दिली आहे. तरी देखील ते जनतेला वेळेवर मिळत नाही. मग या औषधांचा उपयोग कुणाला व कधी होतो. असा प्रश्न भेडसावत आहे.