श्रीरामपूर येथील संत लोयोला सदनमध्ये सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत संत इग्नाती लोयोलोकर यांचा सण साजरा करण्यात आला.

श्रीरामपूर  येथील संत लोयोला सदनमध्ये सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत संत इग्नाती लोयोलोकर यांचा सण साजरा करण्यात आला.
श्रीरामपूर  येथील संत लोयोला सदनमध्ये सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत संत इग्नाती लोयोलोकर यांचा सण साजरा करण्यात आला.

श्रीरामपूर - दि. ३१/०७/२०२१ श्रीरामपूर येथील संत लोयोला सदनमध्ये सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत संत इग्नाती लोयोलोकर यांचा सण साजरा करण्यात आला यावेळी यांच्या प्रतिमेस मौलाना अकबर काझी व माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला

          महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती अल्पसंख्यांक विकास परिषदेच्यावतीने लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. प्रकाश भालेराव, संत झेवियर्स इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य रे. फा. विक्रम शिनगारे, श्रीरामपूर आय. टी. आयचे प्राचार्य रे. फा. संपत भोसले, लोयोला दिव्यवाणीचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. अनिल चक्रनारायण, राहुरी चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. राजू शेळके या धर्मगुरूंचा बुके व शाल देवून सत्कार करण्यात आला.

             याप्रसंगी अशोक कानडे म्हणाले, संत इग्नाती लोयोलोकर यांनी येशू संघाच्या माध्यमातून जगभरात सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम केले ते अनमोल आहे समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी मोठा वाटा उचलला त्यांचे कार्य सर्वांना माहीत आहे समाजाच्या उन्नतीसाठी ज्या ज्या संतांनी कार्य केले ती संत मंडळी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा देतात त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आज सर्व धर्मीय धर्मगुरूंना बोलावून त्यांचा गौरव करण्यात आला ही उल्लेखनीय बाब आहे

             यावेळी महानुभव पंथाचे भाईदेव बाबा, दिनेश दत्तराज बाबा, कनोसा होस्टेलच्या सिस्टर्स लुईसा, बीनीना पवार, माजी नगरसेवक संजय छल्लारे, सलिम पठाण, नगरसेवक प्रकाश ढोकणे, भंतोजी आण्णासाहेब झिने, रामदास मगर गुरूजी, योसेफ खंडागळे, संजय साळवे, , पा. आण्णा अमोलिक, अश्फाक शेख तसेच महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती अल्पसंख्यांक विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिपक कदम, अविनाश काळे, भाऊसाहेब तोरणे, संतोष गायकवाड, लेविन भोसले,  प्रशांतराजे शिंदे, मंगल दुशिंग प्रतिभा पंडीत,  विजय त्रिभुवन, सुरेश कोळगे, संदिप हिवाळे, अजितकुमार सुडगे, रविंद्र लोंढे, सुरेश ठुबे, निशिकांत पंडीत, राकेश दुशिंग,  सचिन रूपटक्के , आदेश दुंशिग, संकेत मोरे, विलास पठारे आदीसह कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            आमदार लहू कानडे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, सतीश बोर्डे, सचिन जगताप आदी त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांचा प्रमुख धर्मगुरूंचे हस्ते सत्कार करण्यात आला.