प्रेरणा प्रतिष्ठाण संस्थाच्या वतिने विद्यार्थीनिंना कायदे विषय मार्गदर्शन ...

प्रेरणा प्रतिष्ठाण संस्थाच्या वतिने विद्यार्थीनिंना कायदे विषय मार्गदर्शन ...

 प्रेरणा प्रतिष्ठान संस्था तसेच बहुजन महिला ग्रामीण विकास संघ यांच्या वतीने सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा राहुरी विद्यापीठ येथील विद्यार्थिनी यांना करिअरच्या सुवर्णसंधी व कायदेविषयक मार्गदर्शन या शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रेरणा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत सुरू झालेले सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूट मधील नर्सिंग ANM,OT डिप्लोमा कोर्स, फोटोग्राफी ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल कोर्स, ब्युटी पार्लर कोर्स बेसिक अँड प्रोफेशनल, अंगणवाडी ,बालवाडी कोर्स , इंग्लिश स्पीकिंग कोर्स अत्यंत अल्पशा फी मध्ये सुरू होत असून सदरचे कोर्से महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहेत त्याचा फायदा हा सर्व मुलींनी घ्यावा आणि उत्तम भविष्य घडवावे मुलींनी स्वतःच्या करिअर करे अधिकाधिक लक्ष द्यावे शाळेमध्ये मार्क कमी मिळाले किंवा दहावी बारावी नापास झाले म्हणून शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूट मार्फत करिअरच्या सर्वोत्तम सुवर्णसंधी दिल्या जात आहेत त्याबद्दल मार्गदर्शन सहारा इन्स्टिट्यूट चे अध्यक्षा - तेरेसा साळवे यांनी केले तसेच उपाध्यक्ष - जयश्री साळवे यांनी मुलींना वेगवेगळ्या कोर्स मार्फत उज्वल भविष्यासाठी तसेच नोकरीसाठी आम्ही सहाय्य करू शालिनीताई लाला पंडित यांचे समाजकार्य अतिशय मोठे होते मोठ्या बहिणीच्या समाजकार्याचा आदर्श समोर ठेवून प्रेरणा प्रतिष्ठान मार्फत समाजकार्याचे तसेच महिलांच व मुलींच्या उज्वल भविष्य घडविण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असे प्रतिपादन केले तसेच बहुजन महिला ग्रामीण विकास संघाच्या उपाध्यक्ष अँड. मनिषा लाला पंडित यांनी मुलींना राहुरी शहरांमध्येच करिअरच्या उत्तम संधी सहारा इन्स्टिट्यूट मार्फत उपलब्ध असून त्याचा त्यांनी फायदा घ्यावा व लाभ घ्यावा तसेच मुलींना कायदेविषयक विनामूल्य मार्गदर्शन आमच्याकडून नेहमी दिले जाईल असे प्रतिपादन केले सदरच्या कार्यक्रमाच्या शेवटी प्रेरणा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष जयश्री साळवे यांनी सावित्रीबाई फुले माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा विद्यापीठ राहुरी या शाळेचे सचिव डॉक्टर माने महानंद तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशाताई धनवटे मॅडम उपमुख्याध्यापक श्री इनामदार सर पर्यवेक्षक श्री अरुण तुपविहरे सर व इतर शिक्षक व शिक्षक वृंदावन वर्ग या सर्वांचे त्यांनी केलेल्या मौल्यवान सहकार्याबद्दल आभार मानले सदरच्या कार्यक्रमाला विशेष सहकार्य हे प्रेरणा प्रतिष्ठानच्या खजिनदार निहारिका चौधरी, बहुजन ग्रामीण विकास संघाचे अध्यक्ष विनोद कुमार लाला पंडित, यांचे लाभले.