महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी व गुजरात नैसर्गिक कृषी विज्ञान विद्यापीठ, हालोळ यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व गुजरात नैसर्गिक कृषि विज्ञान विद्यापीठ, हालोळ यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न*
सध्याच्या हवामान बदलाच्या परीस्थितीमध्ये शेतीवर होणारे दुष्परिणाम व शेतीमधील हरीत वायुंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी पर्यावरण पुरक, कमी खर्चाच्या व रसायन अवशेष मुक्त अन्नधान्य निर्मिती या उद्देशाने नैसर्गिक शेती क्षेत्रातील शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व गुजरात नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ, हालोळ यांच्यामध्ये गुजरात मधील गांधीनगर राजभवनामध्ये गुजरातचे राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु कर्नल कमांडंट डॉ. पी. जी. पाटील व गुजरात नैसर्गिक कृषि विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सी. के. टिंबाडीया यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी गुजरात नैसर्गिक कृषि विज्ञान विद्यापीठासोबत एकूण २२ कृषि विद्यापीठे, सामाजिक संस्था व फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
या प्रसंगी श्री. आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीची गरज याविषयी मार्गदर्शन करताना पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून यशस्विपणे केलेले संशोधन व विस्तार कार्य तसेच नैसर्गिक शेतीतील सुरु केलेले संशोधन प्रकल्प याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्याबदल अभिनंदन केले व देशी गाव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे कार्य देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले.