ता.श्रीरामपूर शहरातील डॉ.ब्रम्हे यांच्या घरी झालेल्या धाडसी चोरीच्या तपासात पोलीसांना यश.

ता.श्रीरामपूर शहरातील डॉ.ब्रम्हे यांच्या घरी झालेल्या धाडसी चोरीच्या तपासात पोलीसांना यश.

श्रीरामपूर - शहरातील डॉ. ब्रम्हे यांच्या घरी झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याच घरामध्ये कामाला असणार्‍या मोलकरणीने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने धाडसी चोरी केल्याची कबुली तिने दिली आहे. याप्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. त्यांना दि. 12 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री डॉ. प्रफुल्ल बाळकृष्ण ब्रम्हे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधून डॉ. ब्रम्हे यांच्या राहत्या घराच्या गच्चीवरील लोखंडी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करुन डॉ. ब्रम्हे यांचे हातपाय बेडशीटने बांधून व मुलगा डॉ. चिन्मय यांच्या खोलीच्या दरवाज्याची बाहेरुन कडी लावून त्यांच्या घरातील लोखंडी कपाट फोडुन कपाटात ठेवलेले 40 लाख रुपये रोख व 7 लाख रुपये किंमतीचा तनिष्क कंपनीचा सोन्याचा हार 14 तोळे वजनाचा असा एकूण 47 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल तीन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला होता. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ तपास पथकास बोलावून सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून तांत्रिक विश्‍लेषणकरुन तसेच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती घेवून आरोपीचा कसून शोध घेत असताना अनेक आरोपींची नावे गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त होत होते. त्यातील सर्व आरोपी विषयी तपास पथक हे गोपनीयरित्या माहिती मिळवत होते. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. बातमीदाराकडुन मिळालेल्या नावापैकी जाबीर रशिद शेख (वय 32, रा. रेट्टी ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर) याने गुन्हा केल्याची माहिती मिळाली असता. त्याच्याविषयी गुन्हा घडल्यापासून ते आत्तापर्यतची माहिती तपास पथकाने मिळविली. सदरील आरोपी हा त्याच्या गावातील लग्नात येणार असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ त्याच्या राहत्या घरी रेट्टी ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर येथे जावून त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा माझी बहिण हिना राजु सय्यद (वय 38, धंदा- मजुरी, रा. घास गल्ली, वॉर्ड नं. 06, ता. श्रीरामपूर) तसेच माझे इतर दोन साथीदार गौसखॉ हनिफखॉ पठाण उर्फ गौश्या, इरफान इब्राहिम पठाण (दोन्ही रा. गराडा, ता. कन्नड, जि.छ. संभाजीनगर) असा आम्ही मिळून केला असल्याची कबुली दिली. त्याच्याकडुन सदर गुन्ह्यातील गेला मुद्देमाला पैकी 12 लाख रुपये रोख रक्कम जाबीर रशिद शेख यांच्या ताब्यातून जप्त केली. 1,35,000 रुपयाची प्लसर मोटारसायकल, 51 हजार रुपयाची सोन्याची एरिंग, 66 हजाराचे सोन्याचे नेक्लेस, 45 हजाराचे सोन्याचे पेडल, 14 हजाराचे चांदीच्या पायातील पट्टया असे एकूण 1 लाख 76 हजाराचे दागिणे चोरीच्या पैशातून खरेदी केलेले तसेच 3 लाख 96 हजार रुपये रोख रक्कम हिना राजु सय्यद हिचे ताब्यातून जप्त केलेले. असा एकूण 19,03000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपी जाबीर शेख याने 2, 75, 000 रु वेगवेगळ्या बँकेचे लोन निल केले असल्याची कबुली दिली. यातील जाबीर रशिद शेख, हिना राजू सय्यद या बहिण भावास अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने दि. 12 जानेवारी 2024 पर्यत पोलीस कोठडी दिली आहे.

--