चांदा येथे जावळे वस्तीवर चोरी रोख रक्कमे सह चार लाख एकतीस हजारांचा ऐवज लंपास.

चांदा येथे जावळे वस्तीवर चोरी रोख रक्कमे सह चार लाख एकतीस हजारांचा ऐवज लंपास.

खेडले परमानंद //वार्ताहर //दि 15. चांदा येथील लोहार वाडी रोडवर असलेल्या जावळे वस्तीवर काल मंगळवारी दि 14रोजी चोरीची घटना घडली असुन अज्ञात चोरट्याने रोख रक्कमे सह सोन्याचे दागिने मिळवून सुमारे चार लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल चोरुन मेल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 

 या बाबत बाबासाहेब चिमणराव जावळे यांच्या फिर्यादीवरून सोन‌ई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत सविस्तर माहिती अशी की दि 13 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेचा दरम्यान जावळे वस्ती लोहार वाडी रोड घर उघडे असताना सदरची घटना घडली आसुन सोन‌ई पोलीस ठाण्यात गु र न 266/2023 भा द वी कलम 454/380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदर घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी श्वान पथक पाचारण केले होते.

        अशाप्रकारे दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

       घटनेचा सर्व आढावा घेऊन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.