बाभळेश्वर म्हसोबानगर येथे दोन गटांमध्ये तणाव.
बाभळेश्वर म्हसोबानगर येथे दोन गटांमध्ये तणाव.
प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
बाभळेश्वर – म्हसोबानगर परिसरात गणेशोत्सव मंडपासमोर विशिष्ठ समाजाने हिरव्या कलरची कमान उभारण्यास सुरुवात केली असता दोन गटांमध्ये वादाचा ठिणगी पडली. स्थानिक नागरिकांनी कमान बाजूला घ्यावी, अशी मागणी केली असता वाद वाढत गेला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या वादात काही व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ केली, धमक्या दिल्या तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. "बंदुकीने उडवून टाकू", "परिसर खाली करा नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील" गुस्ताखे नबी की एक ही सजा सर तन से जुदा, सर तन से जूदा अशा घोषणा देण्यास सुरुवात करून धमक्या देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे वातावरण आणखी तणावपूर्ण झाले.
ग्रामस्थांचे आरोप
सदर ठिकाणी शाळेच्या नावाखाली अवैध बांधकाम करून, त्याला धार्मिक स्वरूप देऊन प्रार्थनास्थळ उभारण्यात आले असून तेथे बाहेरील व परप्रांतीय व्यक्तींची नेहमी वरदळ असते. परिसरातून जाणाऱ्या महिलांना छेडणे, रस्त्यावर थांबून अवैध्य हालचाली करणे, थुंकणे, मोठ्याने हसणे, रोडवर गाड्या लावणे अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. काहीवेळा गौमांस शिजवून त्याचे अवशेष हिंदू कुटुंबांच्या घरासमोर फेकण्यात येतात, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात.
अवैध्य धार्मिक स्थळांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
स्थानिक काही पुढारी विशिष्ठ समाजातील व्यक्तींना राजकीय फायद्यासाठी पाठबळ देतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
काही स्वयंभू पुढाऱ्यांचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून, फिर्यादीवर राजकीय दबाव असल्याची दबक्या आवाजात चर्चा असल्याचं बोललं जात होते.
पोलिसांचा हस्तक्षेप
घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीमुळे वातावरण शांत करण्यात आले. "कायद्याला हात घालू नका, शांतता राखा, आणि कोणताही अवैध प्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा," पोलिस तात्काळ कारवाई करतील आ आवाहन पोलिस प्रशासनाने केले.
संघटनांचा सहभाग
घटनेनंतर बजरंग दलासह इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिडीत नागरिकांना धीर देत "कायद्याच्या मार्गाने लढा देऊ" असे आश्वासन दिले.
नागरिकांमध्ये संभ्रम
गावकऱ्यांच्या चर्चेनुसार, परिसरात राहणारे अनेक लोक बांगलादेशी असून इतर लोक कुठून आले, काय काम करतात, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
प्रशासनाची भूमिका
पोलिस सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून दोन्ही गटांवरून माहिती घेतली जात आहे. "कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
ग्रामसभा होणार
या पार्श्वभूमीवर उद्या गावात विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून ग्रामस्थ या प्रश्नावर एकमुखाने निर्णय घेणार आहेत. "प्रशासनाने कारवाई केली नाही तर कठोर आंदोलनाची हाक दिली जाईल," असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.









