संत फ्रान्सिस झेवियर कॅथोलिक चर्च टिळकनगर येथे जेष्ठ नागरिक मेळावा संपन्न
टिळकनगर - येथील संत फ्रान्सिस झेवियर कॅथोलिक चर्च धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु रेव्ह.फादर पिटर डिसोजा रेव्ह.फादर ॲन्ड्रयु जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नागरिक मेळावा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.
सुरुवातीला परमेश्वराची स्तुती आराधना -पवित्र मिसा बलिदान - प्रवचन -आरोग्य विषयक माहिती - जेष्ठ नागरिकांचे चर्चासत्र -संगीत खुर्ची खेळ इत्यादी कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने पार पडले.शेवटी प्रमुख धर्मगुरु रेव्ह.फादर पिटर यांनी उपस्थित सर्व जेष्ठ नागरिक व भाविकांचे, धर्मगुरु,धर्मभगिनी, युथ ग्रुप लहान थोरांचे आभार मानले व शेवटी प्रिती भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमुख धर्मगुरु फादर पिटर डिसोजा,फा. अँड्र्यू जाधव,सिस्टर उषा, सिस्टर संड्रेला,जे.ना.प्रतिनिधी प्रकाश निकाळे सर,सतिश पाटोळे साहेब,पि.एस.निकम सर,धर्मग्राम समिती उपाध्यक्ष राजेंद्र भोसले सर,युथ ग्रुप अध्यक्ष सौरभ त्रिभुवन,अक्षय ठुबे,पंकज पारखे, प्रविण पंडीत,रोहीत लोखंडे सह अनेकांनी अथक परिश्रम घेतले








