विक्रिस आणलेल्या गांजासह महिला ताब्यात, स्थानिक गुहे शाखा अहमदनगरची कारवाई .

विक्रिस आणलेल्या गांजासह महिला ताब्यात, स्थानिक गुहे शाखा अहमदनगरची कारवाई .

विक्रीस आणलेल्या गांजासह एकरुखे रोड, ता. राहाता येथील महिला ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

 

 

 

 प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पो .नि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पो .नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, अमृत आढाव, भाग्यश्री भिटे व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमूण जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले. 

            पथक राहाता पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-यांची माहिती काढत असतांना दिनांक 23/03/24 रोजी सपोनि/हेमंत थोरात यांना महिला नामे मड्डो सलीम शेख रा. एकरुखे रोड, ता. राहाता ही कब्जात गांजा बाळगुन तिचे राहते घरी विक्री करते अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ राहाता पोलीस स्टेशन येथे जावुन पोनि/सोपान काकडे व स्टाफ तसेच पंच व साधने सोबत घेवुन छाप्याचे नियोजन केले. 

             पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी एकरुखे रोड, ता. राहाता येथे जावुन संशयीत महिला नामे मड्डो सलीम शेख हिचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन, तिचे राहते घरा समोर जावुन खात्री करता सदर घरात 1 महिला दिवाणवर बसलेली दिसली. तिस पोलीस पथकाची ओळख सांगुन तिचे नाव गांव विचारले असता तिने तिचे नाव मड्डो सलीम शेख वय 44, रा. एकरुखे रोड, ता. राहाता असे असल्याचे सांगितले. तिच्या घराची पंचा समक्ष झडती घेता तिचे घरातील दिवाणमध्ये पांढरे रंगाचे गोणीत उग्र वास येत असलेला ओलसर पदार्थ बिया बोंडे, काड्या, पाने व संलग्न असलेला पाला असा हिरवे रंगाचा गांजा मिळुन आला.

 

         पथकाने गोणीत मिळुन आलेल्या बिया बोंडे, पाला व काडया बाबत विचारणा करता तिने गोणीतील बिया बोंडे, पाला व काडया हा गांजा असुन विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याने महिला आरोपी नामे 1) मड्डो सलीम शेख वय 44, रा. एकरुखे रोड, ता. राहाता हिचे घरात 41,200/- रुपये किंमतीचा 4 किलो 150 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळुन आल्याने तो हस्तगत करुन सदर बाबत महिला आरोपी विरुध्द सफौ/दत्तात्रय तानाजी हिंगडे नेम स्थागुशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पो.स्टे.गु.र.नं. 162/2024 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क) सह 20 (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्ह्याचा पुढील तपास राहाता पो.स्टे करीत आहे. 

 

          सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर व वैभव कलुबर्मे , अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर शिरीष वमने , उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.