पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त देडगाव ग्रामपंचायत च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे राजमाता ,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती ग्रामपंचायत मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करत शासन निर्णयानुसार 31 मे 2023
रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त सामाजिक व महिला ,बालविकास क्षेत्रातील कर्तबगार दोन महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम पाचुंदा सोसायटीचे मा.चेअरमन साहेबराव होंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी उल्हारे भाऊसाहेब यांनी केले. दरम्यान ते बोलताना म्हणाले की ,आलेल्या मान्यवरांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तुत्वाचा मोठ्या सन्मानाने उल्लेख केला. व शासन निर्णय नुसार कर्तबगार महिलांना जो पुरस्कार दिला जात आहे .त्याचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम 500 रुपये असे असून त्यांनी केलेल्या कर्तबगारीचा हा सन्मान आहे. व ग्रामपंचायत शासन निर्णय असे नवनवीन उपक्रम नेहमी साजरे करत असून या ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक , व विविध कार्याला हातभार दिला जातो . व सर्व शासकीय कार्यक्रम उत्साहात पार पाडले जातात.ही एक तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत आहे. म्हणत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ताराबाई रमेश कुटे (अंगणवाडी सेविका )व मीनाबाई साहेबराव कदम (आशा सेविका )यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बळीराजा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे ,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके ,मा.सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे व मिनाबाई कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतात कर्तुत्ववान महिला अहिल्याबाई होळकराचे जीवन चरित्र सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न केला. व या आदर्श पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ला अभिवादन केले.
यावेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे ,उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर, कडूभाऊ दळवी ,कर्तव्यदक्ष कामगार तलाठी बालाजी मलदोडे ,मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे, युवा नेते निलेश कोकरे ,शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष एकनाथ फुलारी, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे, पोलीस मित्र समितीचे अध्यक्ष शहादेव मुंगसे ,बालाजी युवा मंचाचे अध्यक्ष पोपटराव बनसोडे, युवा नेते सचिन गोयकर ,दिलदार सय्यद,भैय्या पठाण, ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर गणेशराव तांबे, बाळासाहेब म्हस्के ,संदीप ससाने ,संजय कुटे, उत्तम तांबे तसेच देडगाव आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेविका अनिता सूर्यवंशी मॅडम,अंगणवाडी सेविका जिजाबाई नांगरे, सुसे ताई, तांबे ताई , मंदाबाई अंबाडे ताई, व आदी महीला व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार युनूस पठाण यांनी मानले.