राज्यभरातील कुस्ती प्रेमींसाठी या गावातील कुस्ती सामना ठरत आहे लक्षवेधी.

राज्यभरातील कुस्ती प्रेमींसाठी या गावातील कुस्ती सामना ठरत आहे लक्षवेधी.

प्रतिनिधी :-खेडले परमानंद, नेवासा

        खेडले परमानंद येथे होणार जंगी कुस्त्यांचा सामना.

    मृदा व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख , जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ गडाख, युवा नेते उदयन गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत.

गावातील जेष्ठ नागरिक नानासाहेब तुवर चेअरमन मुळा सहकारी साखर कारखाना, ग्राम भूषण ,कुस्ती सम्राट हाजी पै. हसन भाई इनामदार व सेंद्रिय शेती पुरस्कर्ते सूर्यभान आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बक्षीस जाहीर.

    यामध्ये १)प्रथम बक्षीस :-२१००० व चांदीची गदा पै योगेश वैरागर यांच्या सौजन्याने.

२) द्वितीय बक्षीस:-१५०००

 चांदीची गदा आल्लू भाई इनामदार यांच्या सौजन्याने

३) तृतीय बक्षीस:-११००० चांदीची गदा नयुम इनामदार यांच्या सौजन्याने

४) चतुर्थ बक्षीस:-११०००, चांदीची गदा ,अक्षय आघाव यांच्या सौजन्याने.

५) पाचवे बक्षीस:-११००० सरपंच राजभाऊ राजळे यांच्या सौजन्याने.

६) सहावे बक्षीस:-११००० नवाज इनामदार यांच्या सौजन्याने

कोरोणाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर पहिल्यांदाच जबरदस्त जंगी कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रभरातील अनेक मल्लांना आमंत्रित करण्यात आलेले असून त्यांचा चांदीचा गदा व रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

        राज्यभरातील अनेक मल्लांचे व कुस्ती प्रेमींचे लक्ष ठरत आहे हा जंगी कुस्ती सामना.

अशी माहिती हजरत राजबक्षवली यात्रा कमिटी यांच्याकडून प्राप्त झालेली आहे.