बालाजी देडगाव येथील संजय थोरात व बिरूदेव भिसे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरि सत्कार.

बालाजी देडगाव येथील संजय थोरात व बिरूदेव भिसे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरि सत्कार.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे बिरूदेव शिवाजी भिसे व संजय शिवाजी थोरात यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरि सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे (अण्णा) हे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाने यांनी केले. यावेळी विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे व प्रेमचंद हिवाळे यांनी आपली मनोगत व्यक्त करत भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. 

           दोन्ही तरुण अतिशय सर्व सामान्य कुटुंबातील असून त्यांनी आपले ध्येय गाठत यशस्वीरित्या मुंबई पोलीस भरतीमध्ये भरघोस गुणांनी परीक्षा पास झाले. बिरुदेव भिसे हा धनगर समाजातील असून वडील मेंढी पालनाचा व्यवसाय करतात त्यांनी परिस्थितीवर मात करून आपलं ध्येय गाठलं. व संजय थोरात हा आदिवासी समाजातील असून जरी मागासलेला समाज असला तरी त्यातून मार्ग काढत त्याने जीवनातील खडतर प्रवास करून समाजाला छेद देता मागासलेला समाज असूनही गरिबीतून शिक्षण घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करून पोलीस दलात भरघोस गुणांनी त्याची निवड झाली. मागासलेल्या समाजातून हा पहिलाच पोलीस झाल्याने परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

        यावेळी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी चेअरमन भानुदास पाटिल मुंगसे, सोन्याबापु मुंगसे ,कडूबाळ दळवी, दत्तूआपा तांबे, सोसायटीचे संचालक जनार्दन मुंगसे , एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी थोरात,अहिल्याबाई होळकर शाळेचे माजी प्राचार्य भाऊराव मुंगसे सर, सोसायटीचे सचिव रामा तांबे ,

इंजिनियर रवींद्र बनसोडे,बजरंग दलाचे उपाध्यक्ष शिवाजीराव काजळे, गणेश बनसोडे ,प्रगतशील शेतकरी गणपत कोकरे, मुरलीधर मुंगसे, विश्वास हिवाळे ,अशोक वांढेकर ,सुरेश हिवाळे, किशोर वांढेकर, लक्ष्मण गोफने,बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुभाष मुंगसे, व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार माजी सरपंच दत्ता पाटील यांनी मानले.