शेवगाव तालुक्यातील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीतील गॅगचा मोरख्या भारत अशोक चितळकर शेवगाव पोलिसांनी केला जेलबंद

शेवगाव तालुक्यातील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीतील गॅगचा मोरख्या भारत अशोक चितळकर शेवगाव पोलिसांनी केला जेलबंद

शेवगाव तालुक्यातील ट्रॅक्टर,ट्रॉली चोरीतील गॅगचा म्होरक्या भारत अशोक चितळकर शेवगाव पोलीसांकडुन जेरबंद

 

प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की त्याचे साथीदाराकडुन एकूण 05 गुन्हयातील ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकुण 21,15,000 /- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत की,गेले तीन ते चार महिन्यापासुन शेवगाव तालुक्यातील आखेगाव ,वाडगाव, सुकळी, हसनापुर, आव्हाणे, येथुन ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या चोरीच्या घटना घडल्याने खालील प्रमाणे शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले होते. ।400/2022 भा.द.वि. कलम 379 योगेश बाबासाहेब गरड रा. सुकळी ,ता.शेवगाव यांच्या मालकीचा 6,00,000 /- रु.किं.चा.ट्रॅक्टर स्वराज कंपनीचा ।630/2022 भादवि कलम 379 विक्रम धोडींबा जवरे रा.वाडगाव ता.शेवगाव यांच्या मालकीचा 60,000 /- रु.किं.ची एक ट्रॉली 

674/2022 भा.द.वि. कलम 379 विठ्ठल विक्रम ढाकणे रा. हसनापुर,ता.शेवगाव यांच्या मालकीचा 11,95,000 /- रु. किं.च्या 2 ट्रॉली ।800/2022 भादवि कलम 379 सुधाकर भिवसेन काटे रा.आखेगाव,ता.शेवगाव यांच्या मालकीची 60,000 /- कि.ची एक ट्रॉली ।801/2022 भा. द. वि. कलम 379 रंजित अशोक बेळगे रा.वाळुज ता.पाथर्डी यांच्या मालकीचा 2,00,000 /- रु.किं.चा एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर 

 वरील विविध गुन्हे उघडकीस आणणेकरिता मा.श्री.राकेश ओला साहेब पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा.श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर मा.श्री.संदीप मिटके उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर प्रभारी चार्ज शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.विलास पुजारी शेवगाव पोलीस स्टेशन यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथील स.पो.नि. पावरा ,स.पो. णी. रमेश बागुल,स.पो.नि. आशिष शेळके,पो.हे.कॉ नाकाडे, पो.हे.कॉ. मरकड,पो.हे.कॉ. शेळके बाबासाहेब पो.ना. टेकाळे,

पो.ना. काळोखे बी, पो.ना.बागुल,पो.ना. लिपणे,पो.ना. धोत्रे सुखदेव, पो.कॉ. शिरसाठ, पो.कॉ. राजु ढाकणे, पो.कॉ. खेडकर संपत, पो. कॉ. सचिन खेडकर, पो.कॉ. धाकतोडे,पो.को. खेडकर रामहरी, पो.कॉ. खंडागळे, पो.कॉ. फकीर ,चालक पो.ना. रवींद्र शेळके , पो.ना. घुगे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार याचे 03 पथक तयार करुन वेगवेगळ्या भागात पाठवुन गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढुन आरोपी गणेश काकासाहेब झिरपे रा.कोळगाव ता.शेवगाव यास सापाळा रचुन ताब्यात घेवुन त्याचेकडे वरील ट्रॅक्टर व ट्रॉलीबाबत चौकशी केली असता त्यांने त्याचे साथीदार नामे संजय रावसाहेब खर्चन रा.आखेगाव,ता.शेवगाव भारत अशोक चितळकर वय -22 वर्षे,रा.गुंतेगाव ता.गेवराई ,जि.बीड सचिन गोर्डे,रा.गुंतेगाव ता.गेवराई ,जि.बीड (फरार) लाला गोर्डे ,रा.गुंतेगाव ता.गेवराई ,जि.बीड (फरार) यांचेसह ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीचे वरील गुन्हे केल्याची कबुली दिल्याने आरोपीं संजय रावसाहेब खर्चन रा.आखेगाव, ता.शेवगाव भारत अशोक चितळकर वय -22 वर्षे,रा.गुंतेगाव ता.गेवराई ,जि.बीड यांना अटक करुन वरील 05 गुन्ह्यातील चोरीस गेलेले ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकुण 21,15,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदर गुन्हयाचा तपास मा.पोनि/विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. मरकड, पोना/काळोखे बी., पो.ना. टेकाळे हे करित आहेत. 

 आरोपी नामे गणेश काकासाहेब झिरपे रा.कोळगाव ता.शेवगाव यांचेविरुध्द दाखल गुन्हे खालीलप्रमाणे 

अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम 

 1. चंकलाबा पोलीस स्टेशन ता.गेवराई ,जि.बीड । 117/2020 भादवि कलम 379,34 संजय रावसाहेब खर्चन रा.आखेगाव, ता.शेवगाव यांचेविरुध्द दाखल गुन्हे खालीलप्रमाणे 

अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम 

 1. चंकलाबा पोलीस स्टेशनता.गेवराई ,जि.बीड । 147/2020 भादवि कलम 379,34 

 2. चंकलाबा पोलीस स्टेशन ता.गेवराई ,जि.बीड । 34/2020 भादवि कलम 379,34 

 3. चंकलाबा पोलीस स्टेशन ता.गेवराई ,जि.बीड । 4/2021 भादवि कलम 379,34 

 ताजा कलम

 सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला साहेब पोलीस अधिक्षक, अहमदनगर सो, मा.श्री . प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर सो, मा.श्री.संदीप मिटके साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर चार्ज शेवगाव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे मा.पोनि/श्री.विलास पुजारी व शेवगाव पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.