केशर मल्टीस्टेट चे उद्योजक राहुरी नगरपरीषद विद्यमान नगरसेवक सागर तनपुरे यांनी केला सौ स्मार्ट खेळ पैठणी स्पर्धेचा शुभारंभ
दिनांक २९.५.२०२२ रोजी केशर मल्टीस्टेट चे उद्योजक तसेच माननीय नगरसेवक सागर दादा तनपुरे यांनी आयोजित केलेल्या सौ.स्मार्ट खेळ पैठणीचा आय लव राहुरी या स्पर्धेमध्ये राहुरी शहरातील अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सदरच्या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन माननीय नगरसेवक सागर दादा तनपुरे यांनी केले होते सदरच्या स्पर्धेमध्ये राहुरी शहरातील सौ.निकिता वैभव साळवे यांनी आय लव राहुरी सौ .स्मार्ट खेळ पैठणीच्या विजेत्या ठरल्या त्याबद्दल त्यांचे सौ. स्मार्ट पैठणीचे आयोजक माननीय नगरसेवक तसेच केशर मल्टीस्टेट चे उद्योजक सागर दादा तनपुरे यांनी सत्कार केला तसेच दुसऱ्या विजेता सौ प्रिया शुभम हुगे यांनी सोन्याची नथ मिळवली तसेच तिसरे बक्षीस अश्विनी रमेश गडाख यांनी चांदीचे नाणे मिळवले या सर्वांचा सत्कार उपस्थित मान्यवर राहुरी नगर परिषदेचे अध्यक्षा डॉ .सौ. उषाताई तनपुरे युवा नेते हर्षद दादा तनपुरे, साधनाताई तनपुरे तसेच पोलीस उपाधिक्षक मिटके यांच्या पत्नी सौ.डॉक्टर मिटके या सर्वांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सदरच्या कार्यक्रमात प्रोत्साहनात्मक म्हणून पहिल्या दहा विजयी महिलांना आय लव नगर टीम च्या वतीने 10 कप देण्यात आले तसेच सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना माननीय नगरसेवक सागर दादा तनपुरे यांच्यावतीने ट्रॉफी देण्यात आल्या सदरच्या कार्यक्रमासाठी केलेल्या सहकार्याबद्दल राहुरी (नगरपरिषदेच्या समन्वयक) सुनंदा ताई सदाशिव दहातोंडे तसेच (पतंजली ग्रुप ) योजना ताई लोखंडे तसेच कांचन पानसंबळ तसेच (बहुजन महिला ग्रामीण विकास संघ ) उपाध्यक्ष अँड मनिषा लाला पंडीत तसेच आणि अनिल देशपांडे सर या सर्वांचा देखील सत्कार माननीय नगरसेवक सागर दादा तनपुरे नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ उषाताई तनपुरे युवा नेते हर्षद दादा तनपुरे उपस्थित व इतर उपस्थित मान्यवरांनी केला तसेच आय लव नगर ग्रुपच्या व टीमच्या वतीने सदरच्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय नगरसेवक तसेच केशर मल्टीस्टेट चे उद्योजक सागर दादा तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तसेच भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सदर कार्यक्रमाच्या शेवटी राहुरी नगरपरिषदेच्या समन्वयक कुमारी सुनंदाताई सदाशिव दहातोंडे यांनी माननीय नगरसेवक व केशर मल्टीस्टेट चे उद्योजक सागर दादा तनपुरे यांचे त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच आय लव नगर टीमचे देखील आभार मानले व त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.