आहिल्यानगरचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी सिद्धरामजी सालीमठ यांची पुणे येथे साखर आयुक्तपदी पदोन्नती.

अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी पदावर असतांना सर्व क्षेत्रात आपली कार्यतत्परता सिद्ध करून जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चिला साजेशे काम करणारे हुशार व्यक्तीमत्व जिल्हाधिकारी सिद्धरामजी सालीमठ यांची पुणे साखर आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे
त्यांच्या या दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय तळागाळात रहाणाऱ्या लोकांपासून ते सन्माननिय पंतप्रधान मोदीजी तसेच सन्माननिय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मु यांच्या आगमन व प्रस्थाना पर्यंत अतिशय चोख व्यवस्था ठेवणाण्याचे काम जिल्हाधिकारी यांनी केले आहे . जिल्ह्यातील पत्रकार असो शेतकरी असो वा काम करणारा मजुर वर्ग असो त्यांना भ्रमण ध्वनीवरून नुसता संपर्क जरी केला तरी न्याय देण्याचे काम झाल्याचे दिसून आले आहे . कोणत्याही कामात सकारात्मक भूमीका असणारे जिल्हाधिकारी साहेब यांना निरोप देतांना जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हयातील जनता ही भाऊक झाल्याचे दिसून आले आहे .
जनतेचे प्रश्न वेळोवेळी सोडवणे हा त्यांचा छंद . २४ तासात केव्हाही भ्रमण ध्वनिवर उपलब्ध असणारे अधिकारी यांच्या निरोप समारंभा वेळी मा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आशिषजी येरेकर आर.डी.सी.राजेंद्रजी पाटील सर तसेच सध्या पूनर्वसनचे काम अतिशय चांगल्या पद्धतीत हाताळणारे कर्तव्यदक्ष निवडणूक अधिकारी मा. शाहुराव मोरेजी उपस्थित होते . यावेळी
आयुक्त पदाच्या पदोन्नतीच्या पदभारा करीता Delhi91 News / Nation Expart News (Delhi) चे महाराष्ट्र प्रमुख कृष्णाजी गायवाड तसेच जिल्हा अध्यक्ष सचिनजी पवार व उपजिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .