बालाजी देडगाव येथे भगवान हनुमंताचा (कुटे वस्ती) येथिल अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे शंतिब्राम्ह ,ह भ प भास्करगिरी महाराज व ह भ प महंत प्रकाशनंद गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज यांच्या अधिपत्याखाली सालाबाद प्रमाणे बुधवार दिनांक 12/4/2023 रोजी पासून भगवान् हनुमान (कुटेवस्ती ) यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुकाणा रोड (कुटे वस्ती )ग्रामस्थ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते ह भ प भाग्यश्रीताई देवढे महाराज यांच्या मधुर वाणीतुन श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज पहाटे 4 ते 6 या वेळात काकडा भजन,7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण , 3 ते 5 भजन व सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ,6 ते 7: 30 महाप्रसादा च्या पंगती व रात्री 7:30 ते 10 श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठाचे चालक ह भ प कविताताई महाराज कदम असतील.
या कार्यक्रमास कथे मध्ये श्रीमद् भागवत माहात्म्य, श्री परिक्षीत जन्म, धृवबाल चरित्र, भगवान् श्रीकृष्ण जन्मोत्सव, बाललीला, गोवर्धन पूजा, , व रुख्मिणी स्वयवर, भक्त सुदामा चरित्र, . असे अनेक प्रसंग या कथेतून श्रवण करायला मिळणार आहे. हा आगळा वेगळा कार्यक्रम नेवासा तालुक्यातील भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे. कथेच्या शेवटी श्रीरामाची, हनुमानाची आरती घेतली जाईल . व या आरतीसाठी नवनवीन विवाहित जोडपी मोठ्या आनंदाने सहभागी होणार आहे. मंगळवार दिनांक 18/ 4 /2023 रोजी दुपारी 4 ते 5 या वेळेत कलश मिरवणूक होईल.या परिसरात मोठी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहास शिवशक्ती मित्र मंडळ बालाजी देडगाव व कबीरदास भजनी मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ मोलाचे कष्ट घेणार आहेत.
सप्ताहाची सांगता बुधवार दिनांक 19 /4 /2023 रोजी सकाळी 9 ते 11 ह भ प भाग्यश्रीताई देवढे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल.