खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सोनईचा आठवडे बाजार सुरू..

प्रतिनिधी'- सोनई तालुका नेवासा.
कोरोणा च्या पार्श्वभूमीवर बंद असलेला सोनई चा आठवडे बाजार खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नंतर आज शेतकरी व व्यापारी यांच्या व ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मोठ्या उत्साहात सुरू झाला.
बाजार सुरू झाल्यामुळे व्यापारी वर्गात त्याचप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला आठवडे बाजार ही एक मोठी पर्वणीच असते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे..
आठवडे बाजारात अनेक छोटे-मोठे व्यवसायिक आपला व्यवसाय मोठ्या थाटात थाटतात ..
त्यामुळे लघु व्यावसायिकांनाही दिलासा प्राप्त झाला आहे.