मंत्री गडाख पिता-पुत्राच्या हत्या करण्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप च्या निषेधार्थ संपूर्ण नेवासा तालुका बंद.
प्रतिनिधी :-नेवासा
मंत्री गडाख पिता पुत्राला मारण्याचा कट असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आज गडाख समर्थकांच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदला संपूर्ण तालुक्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
झालेल्या घटनेच्या निषेधार्थ गावोगावी निषेध सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. झालेले कृती ही लोकशाहीच्या दृष्टीने घातकी असून अशा प्रकारचे कृत्य होणे योग्य नाही अशा शब्दात नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज आमच्या पत्रकार बांधवांनी संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला असता या बंदला संपूर्ण प्रतिसाद मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे
नामदार शंकरराव गडाख यांच्या पी एं वर झालेला हल्ला तद्नंतर लगेचच व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप
यामुळे संपूर्ण तालुका भर वातावरण तापलेले आहे. अगदी तळागाळातून अशा घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोनई व परिसरातील बारा वाड्या ,खेडले परमानंद, घोडेगाव, चांदा, कौठा, खरवंडी, नेवासा, नेवासा परिसरातील अनेक गावे, करजगाव, निंभारी ,पानेगाव, सलबतपुर, शिरसगाव, देवगाव, कुकाना ,भेंडा, खूपटी, शनिशिंगणापूर, मिरी- माका, वरखेड, शिरेगाव, प्रवरा संगम, पाचेगाव, पुनतगाव,खेडले काजळी, देवगड, बाभळगाव,वडाळा, मोरया चिंचोरे,लोहगाव,सुरेगाव,पिंपळगाव असा सर्वत्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
होणाऱ्या प्रत्येक निषेध सभेमधून निषेध नोंदवण्यात येत आहे.