कृषि यांत्रिकीकरण आणि रब्बी पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न .

कृषि यांत्रिकीकरण आणि रब्बी पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न .

*कृषि यांत्रिकीकरण आणि रब्बी पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न*

 

       महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या नेतृत्वाखाली कृषि संशोधन केंद्र, चास, ता. जि. अहिल्यानगर येथे सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, आणि कृषि संशोधन केंद्र, चास, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि यांत्रिकीकरण आणि रब्बी पीक लागवड तंत्रज्ञान या विषयी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे होते. याप्रसंगी कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बाष्ठेवाड ,सहाय्यक प्राध्यापक प्रा. महेश पाचारणे, डॉ. संजय भांगरे,डॉ. रविकिरण राठोड, कृषी संशोधन केंद्र, चासचे प्रभारी अधिकारी श्री. काशिनाथ गवारी तसेच कृषी विभागाच्या साहायक कृषी अधिकारी श्रीमती. गोसावी यांची उपस्थिती होती.

           यावेळी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ. सचिन नलावडे यांनी शेतीमध्ये यांत्रिकरणाचा आणि विविध अवजारांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढवता येईल हे विषद केले. यांत्रिकीकरणाच्या बाबतीत गेल्या ४० ते ५० वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आजची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.

 

         यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्व तसेच सध्याच्या मनुष्यबळाच्या अभाव असलेल्या परिस्थितीमध्ये शेतीत यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही असे सांगितले. डॉ. संजय भांगरे, डॉ. रविकिरण राठोड,श्री. काशिनाथ गवारी यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. महेश पाचारणे यांनी सेवा संकल्प अभियान अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण आणि रब्बी पीक लागवड तंत्रज्ञान या विषयी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली. यावेळी ट्रक्टरचलित बंदिस्त वाफे तयार करण्याचे अवजाराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश पाचारणे यांनी तर आभार डॉ. संजय भांगरे यांनी मानले. या प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमास चास पंचक्रोशीतील शेतकरी व महिला उपस्थित होते.