महात्मा फुले कृषी विद्यापीठात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान संपन्न .

महात्मा फुले कृषी विद्यापीठात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान संपन्न .

*महात्मा फुले कृषी विद्यापीठात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान संपन्न* 

        महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके व विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी काष्टी, मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. महानंद माने, कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र हिले, उपकुलसचिव (प्रशासन) श्रीमती स्वाती निकम, उपकुलसचिव (विद्या) श्री. विजय पाटील, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ व सहाय्यक कुलसचिव (का.व्य.) श्री. महेश घाडगे उपस्थित होते.

         यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व पदुत्तर महाविद्यालयातील व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनीं यांनी महात्मा फुले पुतळा परिसर, प्रशासकीय इमारत परिसर, वसतीगृहे, डॉ. नानासाहेब पवार सभागृह परिसर, ग्रंथालय परिसर व महाविद्यालयांच्या परिसरामध्ये स्वच्छता केली. याप्रसंगी प्रशासकीय इमारती समोर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. विलास आवारी यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. श्री. महेश घाडगे यांनी यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली व कार्यक्रमाचे आभार मानले.