गंगापूर :- दि. २२/१२/२०२२, तालुक्यातील वाहेगाव येथील सेंट मेरी प्राथमिक व उच्च माध्यमिक व्यवसायीक कनिष्ठ महाविद्यालयात २०२२ चा बाळ येशूचा आगमन काळ साजरा

गंगापूर:- दि. २२/१२/२०२२,तालुक्यातील वाहेगाव येथील सेंट मेरी प्राथमिक व उच्च माध्यमिक व्यवसायीक कनिष्ठ महाविद्यालयात २०२२ बाळ येशूचा आगमन काळ साजरा याकाळात प्रतिमेला शाळेच्या आवारातून स्टेज पर्यंत शाळेचे मॅनेजर रेव्ह फा संजय रुपेकर, शाळेचे पर्यवेक्षक श्री. थोरात के एम सर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, श्री.जाधव सर तसेच शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या येणाऱ्या ख्रिसमस आगमन काळातील मिरवणूकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या उत्साह सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सौ. कोळगे मॅडम ( पंचायत समिती अधिकारी, गंगापूर ) यांचे शाळेत साॅलोमन व पुष्पगुच्छ देवून स्वागत व सन्मानित करण्यात आले. सौ. कोळगे मॅडम यांचे हस्ते, शाळेत झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला वर्ग --- रांगोळी स्पर्धेत इ १० वी -क, स्टार बनवणे इ. ९ वी -क, ग्रीटिंग कार्ड इ. ७ वी -क, नाताळ गीत इ. ६ वी -क आणि ख्रिसमस ट्री इ. १ ली. या वर्गांंचे बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात, हा सर्व आनंद मोहोत्सव पाहून "असा आनंद मी यापूर्वी घेतला नाही, अनुभवला नाही" असे सौ. कोळगे मॅडम म्हणाल्या व नाताळ सणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक श्री. थोरात के एम व श्री अविनाश त्रिभुवन सर यांनी यावर्षीची बाळ येशू जन्म देखावा म्हणजे ज्या गव्हाणीत बाळ येशूचा जन्म झाला तो देखावा तयार केला. सर्वांसाठी नाताळचा संदेश देवून व प्रार्थना रेव्ह. फा. प्राचार्य, संजय रुपेकर यांनी केली. सदरील कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. कुटे सर व श्री. पारखे सर यांनी केले. सर्वात शेवटी सर्वांचे आभार श्री. अजय थोरात सर यांनी मानले