सोनई परिसरातून केबल चोरीच्या घटनेत वाढ श्रीरामवाडी परिसरातील चार ते पाच शेतकऱ्यांच्या केबलची चोरी ,केबल चोरीचे सत्र सुरूच.
सोनई परिसरातून केबल चोरीच्या घटनेत वाढ श्रीरामवाडी परिसरातील चार ते पाच शेतकऱ्यांच्या केबलची चोरी
. सोनई /वार्ताहर /. सोनई जवळील श्रीरामवाडी परिसरातून चार ते पाच शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या घटना सातत्याने घडत असून त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या आधी सुद्धा या परिसरातुन केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत मात्र यांचा एकाही चोरीचा तपास अद्याप लागलेला नसताना आता पुन्हा चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे पोलिसांनी याचा कसोशीने तपास लावावा अशी मागणी परिसरातुन करण्यात येत आहे वारंवार केबल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे त्यातच बिबट्याच्या भीतीने शक्यतो रात्रीच्या वेळी कुणी शेतात जात नसल्याने याच संधीचा फायदा चोरा कडून उचला जात आहे या आधी सुद्धा श्रीरामवाडी आणि परिसरात बऱ्याचशा इलेक्ट्रिक मोटरच्या केबल चोरीच्या घटना घडलेल्या आहेतट गेल्या काही दिवसापूर्वी याच श्रीरामवाडी येथून घरासमोर लावलेला ट्रॅक्टर पळविण्याची घटना घडली होती सोनई पोलिसांनी सदर ट्रॅक्टरचा शोध लावला मात्र यातील आरोपीना मात्र अटक झाली नाही सोनई परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने या भागातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरतात वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे