स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचा शंकर सावंत यांचा राजीनामा.
स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचा शंकर सावंत यांचा राजीनामा.
सोनई //वार्ताहर//. घोडेगाव येथील स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचा शंकर शांताराम सावंत यांनी राजीनामा प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ चौगुले सर यांच्या कडे दिला व कमिटीने राजीनामा मंजूर केला असल्याची माहिती मिळाली शंकर सावंत हे या मंडळाच्या उप अध्यक्ष पदावर कार्यरत होतें आपल्या राजीनामा पत्रात सावंत यांनी आपल्या वैयक्तिक घरगुती अडचणी मुळे आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे माझी संस्थेबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आपल्या वैयक्तिक घरगुती अडचणीमुळे मी काम करू शकत नसल्याने मी आपल्या पदाचा स्व इच्छेने राजीनामा देत आहे असे शंकर सावंत यांनी आपल्या राजीनामात म्हटले आहे तरी माननीय अध्यक्षाने माझा राजीनामा मंजूर करावा असे म्हटले आहे स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने महात्मा फुले बाल संगोपन केंद्र घोडेगाव येथे चालविले जाते शंकर सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे जरी आपल्या राजीनामयात त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत आहोत असे कारण दिले असले तरी यामागे वेगळे कारण असल्याची चर्चा आहे त्यामुळे डबरी गोसावी समाजामध्ये खळबळ उडाली आहे