बालाजी देडगाव येथिल सय्यद बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
बालाजी देवगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) आज दिनांक १७ रोजि
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे पुरातन काळापासून चालत आलेला सय्यद बाबा चा उरूस याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंदू - मुस्लिम समाजाच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु- मुस्लिमांचा ऐक्य समजल्या जाणाऱ्या दर्ग्याची भाविक मनोभावे दर्शनासाठी आले होते. दरवर्षी प्रमाणे काल प्रवरा संगम येथून गंगा नदीतून कावडी चे पवित्र पाणी आणून दर्ग्याला पाणी घातले गेले .रात्री छबीना मिरवणुक काढण्यात आली होती .तर यामधे चादर मिरवली जाते. याला संदल चा मान असतो.व आज सकाळी यात्रा उत्सव निमित्त व्हाईकाचे ही नियोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने लोकांची कोडी सोडवली जातात. यावेळी मलिदा, बुंदी, लाडू, पेढे याचा भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
या उत्सवानिमित्त पुजारी लियाकत पठाण, अकबरभाई पठाण, रज्जाक भाई पठाण, इस्माईल पठाण ,खानसाहेब पठाण, जाकिर पठाण, व भाविक अन्वर सय्यद, दिलदार सय्यद, मा. पंचायत समिती सभापती कारभारी चेडे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके, बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपप्रमुख आकाश चेडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके ,पत्रकार विष्णू मुंगसे,दादा साहेब पुंड, मेजर कुलदीप पुंड, सागर पुंड, पप्पू चेडे, महेश चेडे, बालाजी कृषी सेवा उद्योग समूहाचे मालक योगेश चेडे,रामभाऊ देवा पुंड, श्रीमंत पुंड, कानिफनाथ पुंड, महादेव पुंड, रामा देवा पुंड, मयूर कदम व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.