सामाजिक कार्यकर्ते संतोषराव तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सन्मान.

सामाजिक कार्यकर्ते संतोषराव तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सन्मान.

बालाजी देडगाव:-  (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र ,सामाजिक कार्यकर्ते संतोष

राव तांबे यांचा वाढदिवस विविध ठिकाणी साजरा करण्यात आला.

            संतोषराव तांबे हे प्रगतशील बागायत शेतकरी असून, बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन, संत सावता माळी परिषदेचे तालुका अध्यक्ष ,देडगाव सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन असे अनेक पदावर कार्यरत असलेले व नामदार शंकरराव गडाख यांचे अति विश्वासू असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे व सामाजिक ,शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रात हातखंडा असणारे शांत, संयमी व सतत हसतमुख असणारे संतोष भाऊंना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातून शुभेच्छा दिल्या आहेत.

         महाराष्ट्रभरातून आलेल्या शुभेच्छा मुळे संतोष भाऊ तांबे हे भारावून गेले असून, त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले आहे .व असेच प्रेम कायम माझ्यावर राहो ही सदिच्छा व्यक्त केली आहे. विविध माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा बद्दल ते सर्वांचे आभारी आहेत .अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

          त्यांचा बालाजी कृषी सेवा केंद्र , आनंद ससे फोटोग्राफी शेजारी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान व श्री .क्षेत्र पावन गणपती देडगाव , ग्रामपंचायत, सोसायटी,श्री .संत नागेबाबा परिवार,मुस्लिम संघटना, संत सावता माळी प्रतिष्ठान, पत्रकार संघाच्या अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम घेऊन वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी ,सर्वसामान्यांनी मनोगतातून त्यांना पुढील जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .त्यांच्यावर या शुभेच्छातून प्रेमाचा वर्षाव होत आहे.विविध संघटनेच्या, शाखेच्या व वैयक्तिक वतीने त्यांचा वाढदिवस निमित्त सन्मान करण्यात आला.