नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथे चाइल्ड इंग्लिश करियर स्कूल मध्ये योगादिन उत्साहात साजरा.

नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथे चाइल्ड इंग्लिश करियर स्कूल मध्ये योगादिन उत्साहात साजरा.

           BPS  NEWS नेवासा तालुका प्रतिनिधी पत्रकार युनूस पठाण.

    नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे चाइल्ड करीयर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  मध्ये "आंतरराष्ट्रीय योग दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री. संजय गरुटे सर यांनी मुलांना योग अभ्यासाचे धडे दिले. सकाळच्या सुंदर अशा वातावरणात मुलांनी योगासने अति उत्साहाने व आनंदाने करून उपस्थितांचे लक्ष वेधले. योग दिनानिमित्त पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. प्राध्यापक श्री. अमोल इंगळे प्राध्यापक प्राध्यापक श्री विजय खाटीक, श्रीमती छाया निकम , स्वाती गायकवाड, कल्पणा भडके, आरती जैन, लिंबे, उमा कुराडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक श्री. संदीप खाटीक सर व श्री. शाहरुख सय्यद यांनी या योग दिन कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. 

ही शाळा कायम मुलांचे संगोपन व हित जोपासणारी विश्वसनीय आहे . मुले ही शारीरिक दृष्ट्या सक्षम करणे काळाची गरज जशी बुद्धीत तेज तशी शारीरिक धडधाकट असायल हवे. 

         "शिर सलामत तो पगडी पचास" या उक्तीप्रमाणे आपले आरोग्य उत्तम असेल तर कोणत्याही गोष्टी आपण साध्य करू शकतो व आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग गरजेचे असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सागर बनसोडे सर यांनी केले

.