संकष्ट चतुर्थी निमित्त आव्हाने गणपती येथे विविध धार्मिक कार्यक्रम

संकष्ट चतुर्थी निमित्त आव्हाने गणपती येथे विविध धार्मिक कार्यक्रम

संकष्टीचतुर्थी निमित्त आव्हणे गणपती येथे विविध धार्मिक कार्यक्रम. 

आव्हाणे बु :- शेवगाव तालुक्यातील गणपती आव्हणे येथे दि.9 रोजी संकष्टी चतुर्थी निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

सकाळी 7 वा. पैठणवरून आणलेल्या गंगेच्या पाण्याने श्रीची आरती वा महाभिषेक प्रा.सुनील आढाव वा राम तोडमल यांच्या हस्ते होईल. दुपारी 12 वा. भाविकांना फराळाची व्यवस्था प्रा.सुनील आढाव व राम तोडमल याच्या वतीने करण्यात आली आहे.सायंकाळी 6 वा. योगेश महाराज दुधाळ यांचे कीर्तन होईल. सायं. 7 वा. श्रीची आरती व महाभिषेक प्रांतधिकारी डॉ.संदीप आहेर याच्या हस्ते होईल. रात्री 9 वा .डॉ.संदीप आहेर यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन निद्रिस्त गणपती आव्हाणे ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.मालोजीराव भुसारी, सरचिटणीस अर्जुनराव सरपते, माजी विश्व्स्त अंकुश कळमकर, रामदास दिवटे, कारभारी तळेकर, सुधाकर चोथे, नारायण जाधव, वसंत भालेराव, सचिव लक्षिमन मुटकुळे यांनी केले आहे.