नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील पीर साहेब बाबा च्या यात्रेचे यात्रा कमिटीच्या वतीने आयोजन
*नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथिल पीर साहेब बाबा च्या यात्रेचे यात्रा कमिटीच्या वतीने होणार भव्य आयोजन.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र पाचुंदा येथील पीर साहेब बाबा चा दरवर्षीप्रमाणे उरूस( यात्रा )मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून यात्रा कमिटीच्या वतीने भव्य आयोजन करण्यात येणार आहे.
दिनांक १० रोजी गंगेचे पाणी आणून पीर साहेब बाबाला कावडीच्या पाण्याने शुद्ध केले जाईल. त्यानिमित्ताने कावड मिरवणुकीचे सायंकाळी ५ .वाजता भव्य आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ११ रोजी छबिना मिरवणूक सायंकाळी ७ वाजता फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व ढोल ताशाच्या गजरात व सजावटीच्या घोड्यावर मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या उरूस यात्रा काळात महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येत असतात . तसेच खाऊवाले, पाळण्यावाले ,खेळणे वाले अनेक दुकानांचेही आयोजन करण्यात आले आहे.पाचुंदा गावचे श्रद्धास्थान म्हणून पीर साहेब बाबाची मोठ्या उत्साहात यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. भक्ती भावाने ग्रामस्थ दर्शन घेत असतात.
दिनांक १२ रोजी परिसरातील नामवंत भव्य हगाम्याचे आयोजन केले असून महाराष्ट्रातील नामवंत मल्ल हाजेरी लावणार आहेत. तालुक्यातील आकर्षण असणारा हा हंगामा समजला जातो.
या यात्रेसाठी यात्रा कमिटी म्हणून गावचे उपसरपंच अविनाश वाघमोडे ,ग्रामपंचायत सदस्य पोपट वाघमोडे ,अविनाश माने ,चंद्रकांत खरात ,सदाशिव कोकरे, तर युवा नेते भरत होंडे ,मा. चेअरमन साहेबराव होंडे, उमेश हंडाळ, नवनाथ माने, अंबादास माने, मीताजी कोकरे, संदीप गोफने ,आजिनाथ ठोंबरे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा भिसे, बाबासाहेब हंडाळ, बहिरनाथ होंडे ,संदीप माने, लक्ष्मण चोपडे ,भास्कर चांडे, नवनाथ शिंदे ,बाबासाहेब चांडे, कैलास शिंगटे, चांगदेव शिंगटे , राजेंद्र होंडे ,अशोक होंडे, मनाजी कोकरे ,हरिभाऊ होंडे ,भारत चंद ,मायनाथ शिंदे, हे आयोजन करणार असून. ही यात्रा उत्सव व्यसनमुक्त करणार असल्याची माहिती देण्यात आली. परिसरातील आकर्षण व आदर्श यात्रा ठरणार आहे.