खेडले परमानंद रोड सोनई येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना.

खेडले परमानंद रोड सोनई येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना.

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी// संभाजी शिंदे

खेडले परमानंद रोड सोनई तालुका नेवासा येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिनांक 8 एप्रिल रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल झाली .

       याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाने दिनांक 8 / 4/ 2024 रोजी 

खेडले परमानंद रोड सोनई येथील किसनगिरी नगर या ठिकाणच्या एका सतरा वर्षीय मुलीचे फुस लावून अमिष दाखऊन अज्ञात कारण्यासाठी अपहरण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.

        फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक बाचकर हे करीत आहेत.