नितीन गोयकर यांची इंडियन आर्मी पदी निवड झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान.
*नितीन गोयकर यांची इंडियन आर्मी पदी निवड झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र नितीन जिजाबापू गोयकर यांची इंडियन आर्मी पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे होते .तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी केले तर प्रा .डॉ.संदीप तांबे, मा. चेअरमन खंडेश्वर कोकरे सर, पावन महागणपतीचे तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त करत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कारास उत्तर म्हणून मेजर नितीन गोयकर यांनी आपल्या जीवनातील खडतर प्रवासाबद्दल माहिती दिली. व माझा ग्रामस्थांनी सन्मान ठेवल्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहील अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या , ग्रामपंचायत, सोसायटी, बजरंग दल, पावन महागणपती देवस्थान, बालाजी देवस्थान, व विविध संघटनेच्या शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला. नेवासा तालुक्यातून या कार्याबद्दल अभिनंदन होत आहे.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख मान्यवर लाभलेले डॉ.अर्जुनराव सुसे,बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे , विश्वस्त सुभाष मुंगसे,माजी अध्यक्ष निवृत्ती मुंगसे, सूर्यभान सोनवणे, जनार्दन तांबे, दत्तू आप्पा तांबे, उपसरपंच महादेव पुंड ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुंगसे, अंबादास तांबे ,लक्ष्मण मुंगसे सर कानिफनाथ गोयकर, संदीप कोल्हे, प्रदीप देशमुख सर, दत्ता पाटील मुंगसे, जिजाबापू गोयकर, बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे, उपाध्यक्ष शिवाजी काजळे, सदस्य गणेश औटी, बाबू मुंगसे, सचिन मुंगसे, पावन महागणपती देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे, सोसायटीचे संचालक जनार्दन देशमुख, चाइल्ड करिअर स्कूलचे संस्थापक सागर बनसोडे सर, पै. रामा टकले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन रामनाथ गोयकर यांनी मानले.