सलग सुट्या मूळे शनि शिंगणापुर मध्ये लाखो भाविकांचे दर्शन

सलग सुट्या मूळे शनि शिंगणापुर  मध्ये लाखो भाविकांचे दर्शन

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी// संभाजी शिंदे

                

सलग सुट्या मूळे शनि शिंगणापुर  मध्ये लाखो भाविकांचे दर्शन

 

नेवासे तालुक्यातील शनी शिंगणापूर येथे नाताळ च्या सलग सुट्ट्यांची पर्वणी साधून लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले. वर्षाचा शेवटचा शनिवार, नाताळ सणाची सुट्टी व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर मध्ये गर्दीचा महापूर लोटला आहे. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी दिवसभरात लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरूच असल्याने शनिशिंगणापूरला यात्रेचे स्वरूप आले होते. मध्यान आरतीचे वेळी मंदिर परिसर व सर्व वाहन तळ गर्दीने फुलून गेले होते. देवस्थान ट्रस्टच्या वतीने वाहन तळापासून बनवण्यात आलेल्या भुयारी दर्शनमार्ग सुरू करण्यात आल्याने दर्शनव्यवस्था सुरळीत पार पडली.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी परिसरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला गर्दीचा उच्चांक होणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी लक्षात घेता देवस्थानच्या वतीने सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात आली असून देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, प्रसाद, भोजन, बर्फी प्रसाद आदी सुविधा पुरविण्यात आले आहेत. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी भाविकांच्या सुविधासाठी झटत आहेत. दर्शन रांग महाद्वारापर्यंत गेल्याने मुख्य रस्त्यावर भाविकांची व वाहनांची गर्दी होती.